लातूरमध्ये मोठी खळबळ : सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह
लातूर जिल्ह्यातील शेळगाव फाट्याजवळील रस्त्याच्या कडेला एका सुटकेसमध्ये अंदाजे २२ ते २५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच वाढवणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला आहे. मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून पोलिस तपास सुरू आहे.
Tags:
LATUR
