इंडस्इंड बँकेच्या लातूर शाखेत श्री गणेशाचे आगमन.......
गणेश चतुर्थी निमित्ताने आज लातूर शहर गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने दुमदुमून निघाले आहे. प्रतिवर्षाप्रमाणे औसा रोडवरील इंडस्इंड बँकेच्या शाखेत श्रींच्या मूर्तीची स्थापना उत्साहात मिरवणुकीने करण्यात आली. त्यानंतर माझं लातूर परिवाराचे प्रमुख, ज्येष्ठ पत्रकार तथा बँकेचे सल्लागार सतीश तांदळे यांच्या हस्ते मूर्तीची विधिवत पूजा करण्यात आली. याप्रसंगी बँकेतील सर्व कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.


