आमदार श्री. धीरज देशमुख यांना मानाचा राज्यस्तरीय कै. बाळासाहेब घुईखेडकर उदयनमूख तरुण सहकारी कार्यकर्ता हा पुरस्कार प्राप्त
त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
-आमदार अमित देशमुख
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय विलासराव देशमुख साहेब आणि माजी मंत्री सहकार महर्षी आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब, यांचा वारसा समर्थपणे चालवून, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच इतर सहकारी संस्थांच्या माध्यमातून, ग्रामीण भागात आर्थिक परिवर्तन घडवून, शेतकरी शेतमजूर यांच्या जीवनात चांगले दिवस आणण्यासाठी श्री. धीरज देशमुख सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन राज्यातील अनेक सुप्रसिद्ध संस्था संघटना यांनी त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. या पुरस्कारातून त्यांना आणखी प्रोत्साहन आणि ऊर्जा मिळेल आणि त्यांच्या हातून उत्तम उत्तम कार्य घडत राहील हा विश्वास आहे. असे मत आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केले
Tags:
LATUR