माहेश्वरी बहुउद्देशिय नागरी सहकारी पतसंस्था मर्या. लातूर यावित्तीय संस्थेत गुंतवणुक केलेल्या.परंतु ठेवीची रक्कम परत न मिळालेल्या ठेवीदारांनी त्यांच्या ठेवींची माहिती आर्थिक गुन्हे शाखा, लातूर येथे विनाविलंब कळविणे.
मागील वर्षात पोलीस ठाणे गांधीचौक, लातूर येथे गुन्हा रजि. नं. 76/2024 कलम 406,409, 420, 465, 467, 468, 471, 201, 34 भादंवि सहकलम 3 व 4 एमपीआयडी अॅक्ट प्रमाणे माहेश्वरी बहुउद्देशिय नागरी सहकारी पतसंस्थेतील पदाधिकारी यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झालेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर याठिकाणी चालू आहे.
नमुद वित्तीय संस्था येथे गुंतवणुक केलेल्या 55 ठेवीदारांची माहिती सद्यःस्थितीत प्राप्त झालेली आहे. तसेच सदर प्रकरणात लातूर जिल्ह्यातील ज्या-ज्या नागरिकांनी नमुद वित्तीय पतसंस्थेत गुंतवणुक केलेली आहे, त्या ठेवीदारांची माहिती एकत्रित करण्याची प्रक्रीया चालू आहे. सदर प्रक्रीये दरम्यान ठेवीदारांच्या वित्तीय संस्थातील हितसंबंधाचे संरक्षण करण्याच्या हेतुने कोणताही ठेवीदार वंचित राहणार नाही.
तरी माहेश्वरी बहुउद्देशिय नागरी सहकारी पतसंस्था मर्या. लातूर यावित्तीय पतसंस्थेत लातूर शहर व परिसरातील ज्या नागरिकांनी ठेव ठेवलेली आहे. परंतू ठेवीची रक्कम परत मिळालेली नाही. अशा ठेवीदारांनी तात्काळ विनाविलंब सविस्तर माहितीसह ईकडील कार्यालयास संपर्क साधावा.
संपर्काचा पत्ता पोलीस उप-अधीक्षक यांचे कार्यालय, आर्थिक गुन्हे शाखा, पोलीस अधिक्षक कार्यालय, अंबाजोगाई रोड, लातूर.Office Email ID eowlatur405@gmail.com
Tags:
LATUR