मा.आ.शिवाजीराव पाटील कव्हेकरांच्या वाढदिवसानिमित्त
लातूर शहरामध्ये विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन
लातूर-
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भाजपा नेते, किसान मोर्चा गोवा व गुजरात राज्याचे प्रभारी तथा लातूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या वाढविसानिमित्त 10 व 11 जुलै 2025 रोजी विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
यामध्ये 10 जुलै 2025 सकाळी 10.00 वा.स्वामी दयानंद विद्यालय, कव्हा येथे मोफत नेत्र तपासणी शिबीर, 11 जुलै 2025 रोजी सकाळी 7.30 वा.मार्केट यार्डातील श्री भगवान गौरीशंकरामध्ये महाअभिषेक, सकाळी 8.00 वा. लातूरातील सुरतशहावली दर्गा येथे चादर चढविणे, सकाळी 8.30 वा. कव्हा येथे शेखमियाँसाहेब दर्गा येथे चादर चढविणे, सकाळी 9.00 वा सिध्देश्वर मंदिरात महाअभिषेक, सकाळी 10.00 वा. एमएनएस बँकेतर्फे मातोश्री वृध्दाश्रम येथे अन्नसेवा, सकाळी 11.00 वा एमएनएस बँकेतर्फे सेवालय हासेगाव येथे अन्नसेवा,सकाळी 11.30 वा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अन्नदान व दुपारी 12.30 वा.शिवाजी महाविद्यालय, रेणापूर तर्फे ग्रामीण रूग्णालय रेणापूर येथे रूग्णांना फळवाटप आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यानंतर भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या वाढदिवसानिमित्त कैलास निवास,मजगे नगर, लातूर येथे कार्यकर्ते व पदाधिकार्यांच्या भेटी-गाठी व संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती एमएनएस बँकेचे उपाध्यक्ष एस.आर.मोरे, जेएसपीएमचे समन्वयक संचालक निळकंठराव पवार, जननायक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांतराव शेळके, एमएनएस बँकेचे प्रभारी कार्यकारी संचालक नितीन सराफ, शैक्षणिक समन्वयक संभाजीराव पाटील, समन्वयक विनोद जाधव, समन्वयक बापूसाहेब गोरे, प्राचार्य आर.एस.अवस्थी, प्राचार्य गोविंद शिंदे, प्राचार्य मारुती सूर्यवंशी, प्राचार्य डॉ.शैलेश कचरे, प्राचार्य शिरीन सॅमसन,प्राचार्य शिवराज बोंडगे, प्राचार्य डॉ.लक्ष्मीकांत गौंड, मुख्याध्यापक शिवाजी सूर्यवंशी, प्राचार्य संदीप पांचाळ, मुख्याध्यापक अरूणा कांदे, मुख्याध्यापक सूर्यकांत चव्हाण, उपप्राचार्य दयानंद हासबे यांनी दिलेली आहे.
Tags:
LATUR