आंबेजोगाई येथील पत्रकार सुनील सिरसाट "जीवनगौरव पुरस्काराने" सन्मानित....!
••••••••••••••••••••••••••••••••••••••••
कै.चंदू दादू भोसले स्मृती आरोग्य प्रतिष्ठान पुणे व दलित पॅंथर संघटनेच्या संयुक्त विद्यमाने अंबाजोगाई येथील पत्रकार सुनिल सिरसाट यांना निर्भीड पत्रकारिता आणि सामाजिक कार्याबद्दलचा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
••••••••••••••••••••••••••••••••••••••••
*(अंबाजोगाई/प्रतिनिधी)*-- महाराष्ट्राचे शैक्षणिक व सांस्कृतिक माहेर घर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात कै.चंदू दादू भोसले स्मृती आरोग्य प्रतिष्ठान आणि दलित पॅंथर संघटनेच्या वतीने राज्यातील विविध क्षेत्रातील विविध मान्यवरांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यात अंबाजोगाई येथील सुनील सिरसाट यांना पत्रकारिता क्षेत्रातील सामाजिक कार्याबद्दल जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
जवळपास गेल्या 18-19 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात पत्रकार म्हणून काम करत असलेले सुनील सिरसाट हे मुळात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असल्याने गोरगरीब-सर्वसामान्य आणि पिडीतांच्या कामासाठी ते सातत्याने कार्यरत असतात. आजपर्यंत सामाजिक कार्य करताना ते विविध शासकीय कार्यालयात या ना त्या मार्गाने खोळंबलेल्या कामांचा अतिशय कौशल्याने निपटारा करुन हाती घेतलेले काम तडीसच काढलेले आहे. त्यांनी आजपर्यंत असंख्य गरजवंतांची कामे करुन दिल्याने ते अंबाजोगाई तालुक्यासह भोवतालच्या तालुक्यात आणि परिसरात सर्वपरिचित लोकप्रिय कार्यकर्ते म्हणून जेवढे परिचीत आहेत. तेवढेच ते एक दबंग-निर्भीड पत्रकार म्हणूनही ओळखले जातात.
अनेकदा सामाजिक-राजकीय आणि प्रशासकीय स्तरावर कामे करताना अत्यंत वाईट अनुभव येतात. अनेकांना सरळ, साध्या पद्धतीने समजावूनही वाकड्यात शिरण्याची वा अवांतर मागण्यांची घाणेरडी सवय असते. मग अशावेळी काहीही कारण नसताना विनाकारण वाकड्यात शिरुन सर्वसामान्यांची कामे टाळणा-यांसाठी सुनिल सिरसाट यांची अडलेले वा अडविलेले काम करुन घेण्यासाठीची हातोटी नामानिराळीच....!
तेंव्हा एक कार्यकर्ता म्हणून नावलौकिक मिळवत आपली छाप समजात सोडून असलेल्या सिरसाट यांचा एकंदरीत हातखंडा पाहता पत्रकारिता क्षेत्रातही अत्यंत निर्भीड-रोखठोक-वास्तव लिखाण करणारा आणि कुणालाही कधीच न घाबरणारा-भिणारा एक दबंग पत्रकार म्हणूनही ते संपूर्ण बीड जिल्ह्यात परिचीत आहेत. शिवाय ते भाजपाचे मराठवाडा विभागावरील पदाधिकारी असुन ईतरही दोन-चार संघटनांचे राज्य-विभाग आणि जिल्हा स्तरावरील पदाधिकारी असल्याने ते आता केवळ बीड जिल्ह्यापुरते परिचीत राहिले नसून संपूर्ण मराठवाडाभर ओळख निर्माण करून आहेत.
त्यांचे समाजातील सर्वच स्तरातील काम पाहून त्यांना पुणे येथील नामांकित असलेल्या कै.चंदू दादू भोसले स्मृती आरोग्य प्रतिष्ठान आणि दलित चळवळीतील ढाण्यावाघ पद्मश्री स्व.नामदेव ढसाळ यांच्या दलित पॅंथर संघटनेच्या 53 व्या वर्धापन दिनानिमित्ताने पत्रकारिता क्षेत्रातील भरीव-उल्लेखनीय योगदानाबद्दल "जीवनगौरव पुरस्काराने" सन्मानित करण्यात आले. पत्रकारिता क्षेत्रातील भरीव-उल्लेखनीय कार्याबद्दलचा त्यांचा हा तिसरा पुरस्कार असल्याने अंबाजोगाईसह सर्वच स्तरातून त्यांच्यावर अभिनंदन-कौतुकाचा वर्षाव होतो आहे....!!.
Tags:
BEED