लातुरच्या एका शिक्षण संस्थेमधील माजी प्रभारी प्राचार्य यांच्या विरुध्द अंध मुली च्या मृत्यु प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे न्या.आदेश
श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था लातुर द्वारा महात्मा बसवेश्वर महाविद्यालय लातुरच्या औसा रोड वरील महिला वस्तिगृहामध्ये कु. शितल गोरे हया अंध मुलीच्या निष्काळजीपणामुळे मृत्यु झाल्याप्रकरणी माजी प्रभारी प्राचार्य सिद्राम डोंगरगे यांच्या विरुध्द दाखल प्रकरणात मा. जिल्हा न्यायालय लातुर यांनी सदोष मनुष्यवधाचा व पुरावे नष्ट करण्याप्रकरणी भारतीय दंड विधान संहिता कलम ३०४ आणि २०१ अंतर्गत मा. पोलीस निरीक्षक विवेकानंद पोलीस स्टेशन लातुर यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेशित केलेले असल्याची धक्कादायक माहिती ॳॅड.सचिन चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेवून दिली.त्यामुळे शिक्षण क्षेत्रा मध्ये एकचं खळबळ उडाली आहे.विशेष म्हणजे या गंभीर प्रकरणी पोलिसांना एक महिन्यांपुर्वी न्यायालयाचे आदेशाची प्रत देवूनही कार्यवाही करण्यास टाळटाळ करण्यात येत असल्याचे सांगीतले जात आहे.अंध मुलीच्या देखभालीसाठी पुरुष व्यक्तींना देखरेखी साठी का ठेवले..?महिला कर्मचारी यांना का ठेवले नाही? सर्वात घृणास्पद बाब म्हणजे त्या अंध मुलीच्या सोबत एकाच रुम मध्ये हे पुरुष कर्मचारी राहत होते का?तिच्यावर अतिप्रसंग तर झाला नाही ना?याबाबतची चौकशी त्यावेळेस पोलिसांनी केली होती का?
वरील प्रकरण वस्तिगृहाकडे माहिती अधिकारात माहिती विचारली असता सदरील मयत मुलगी ही वरील वस्तिगृहात राहत नव्हती अशी खोटी माहिती अॅड. चव्हाण यांना वस्तिगृहामार्फत का देण्यात आली? कोण या प्रकरणातील व्यक्तीना वाचवत होते?अश्या अनेक प्रकारचे प्रश्न समोर येत आहेत.एकंदरीतच अश्या संशयास्पद मृत्यु प्रकरणी आता न्यायालयाने गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याने चौकशी होण्याची अवश्यकता असल्याचे सांगीतले आहे.
महात्मा बसवेश्वर महाविद्यालय लातुर अंतर्गत औसा रोड लातुर येथे युनिव्हर्सिटी अंतर्गत महात्मा बसवेश्वर चालते. कोव्हिड-२०१९ अंतर्गत मा. जिल्हाधिकारी लातुर यांनी जिल्हयातील सर्व वस्तिगृहे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले होते. तसेच स्वा.रा.ती.म. विद्यापीठ नांदेडच्या कुलगुरुंनी प्रा. डॉ. सिद्राम डोंगरगे यांना कोणताही धोरणात्मक निर्णय न घेण्याच्या अटीवर प्रभारी प्राचार्य म्हणुन फेब्रुवारी २०२० मध्ये मान्यता दिलेली होती. असे असतानाही प्राचार्य डॉ. डोंगरगे यांनी काही अंध मुलींना महिला वस्तिगृह येथे बेकायदेशीर प्रवेश दिला होता. त्याठिकाणी विद्यार्थिनीची काळजी घेण्यासाठी कोणत्याही सोयी सुविधा उपलब्ध नव्हत्या, तसेच महिला वस्तिगृह असुनही दोन पुरुष कर्मचारी त्याठिकाणी ठेवण्यात आलेले होते. सदरील मुली हया अंध होत्या. त्यातील कु. शितल संभाजी गोरे ही बी.ए
प्रथम वर्गात शिकणारी मुलगी होती. सदरील वस्तिगृहात कोणताही अधिकार नसताना बेकायदेशीरपणे सदरील मुलीला ठेवुन घेवुन तिची काळजी घेण्यात आली नाही. तिची कसल्याही प्रकारची देखभाल व काळजी न घेतल्यामुळे दिनांक ०६/१२/२०२० रोजी तिचा मृत्यु झाला. त्यानंतर तिला युनिक हॉस्पिटल मध्ये दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी सरकारी हॉस्पिटलमध्ये नेण्याचे सांगितले असता तिचा मृत्यु झाला.
त्यानंतर सदर घटनेची दखल घेवुन अंध व अपंग कल्याण संघटनेचे सचिव अॅड. सचिन भाऊराव चव्हाण यांनी स्वतंत्र तकार मा. जिल्हा न्यायालय लातुर येथे दाखल केली. त्यावेळी त्यांनी वरील प्रकरण वस्तिगृहाकडे माहिती अधिकारात माहिती विचारली असता सदरील मयत मुलगी ही वरील वस्तिगृहात राहत नव्हती अशी खोटी माहिती अॅड. चव्हाण यांना वस्तिगृहामार्फत देण्यात आली. त्यानंतर सदर बाबीची तकार महिला आयोगाकडे केली असता याप्रकरणी चौकशी सुरु आहे. परंतु आरोपीवर कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्यामुळे अॅड. सचिन चव्हाण यांनी मा. न्यायालय लातुर येथे सर्व सबळ पुराव्यानिशी व कागदपत्रासह तक्रार दाखल केली होती.
मा. न्यायालय लातुर यांनी सर्व कागदपत्रांची तपासणी केली आणि कु. शितल गोरे हया अंध मुलीच्या मृत्यु प्रकरणी मा. न्यायलयांनी मा. पोलीस निरीक्षक साहेब विवेकानंद चौक पोलीस स्टेशन यांना भारतीय दंड संहिता कलम ३०४ आणि २०१ अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आणि सबळ पुरावे नष्ट करण्यासंदर्भात एफ.आय.आर. दाखल करण्याचे निर्देश दिलेले आहेत.
संस्थेच्या इतिहासात अशा प्रकारची गैरकृत्ये करणारे माजी प्राचार्य डॉ. सिद्राम डोंगरगे यांच्या विरुध्द यापुर्वी शिक्षकांचे बनावट प्रस्ताव तयार करुन बोगस भरती व एक कोटी रुपयांची आर्थिक अफरातफर प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने एफ. आय. आर. दाखल करण्यात आलेले असल्याची ही माहिती दिली.
Tags:
LATUR