Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

आर्वी शिवारातीत तिर्रट जुगार खेळणाऱ्या आठ जणांवर गुन्हा दाखल

आर्वी शिवारातीत तिर्रट जुगार खेळणाऱ्या आठ जणांवर गुन्हा दाखल. 05,69,000/- रूपयांचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई*



             याबाबत याबाबत थोडक्यात माहिती अशी की, लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे आदेशान्वये,अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात वेळोवेळी मोहीम राबवून अवैध धंदे करणाऱ्या विरुद्ध गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात येत आहे.
          पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे आदेशान्वये व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकाने पोलीस आर्वी शिवारातील विठ्ठल नगर परिसरातील सोमनाथ दत्त याचे घरावर छापा मारून तिर्रट नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना 06 जणांना ताब्यात घेतले आहे,तर एक फरार व एक जुगार अड्डा चालविणारा इसम अशा दोन इसमांचा शोध सुरू आहे.
           यामध्ये 05,69,000/- रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
           एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या आर्वी शिवारातील विठ्ठल नगर परिसरातील सोमनाथ दत्त याचे राहते घरावर शेतामधील पत्राच्या शेडवर येथे 28/07/2025 रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास छापा टाकण्यात आला. यादरम्यान आरोपी तिर्रट नावाचा जुगार रुपये लावून खेळत व खेळवीत असताना सापडल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आले आहे. यामध्ये रोख रक्कम, मोबाईल व जुगाराचे साहित्य असा एकूण 05,69,000/- रुपयाचा चा मुद्देमाल जप्त केला आहे. 
            यामध्ये आरोपी 
 1) आकाश दशरथ सुर्यवंशी, वय-२७ वर्षे रा. आरजखेडा ता. रेणापुर जि. लातुर,

 2) भीमाशंकर सुग्रीव लामतुरे, वय ३४ वर्षे रा. कव्हा नाका, लातुर

 3) राजकुमार खंडु अंबिलपुरे, वय-२४ वर्षे, रा. खोपेगाव ता. जि. लातुर

 4) ऋषीकेश भाऊसाहेब अंधारे, वय-३१ वर्षे, रा. समसापुर ता. रेणापुर जि. लातुर

5) रविकांत बाळासाहेब पवार, वय-३२ वर्षे, रा. गव्हाण ता. रेणापुर जि. लातुर. 

6) अक्षय उत्तम राठोड, वय-२९ वर्षे, रा. हणमंतवाडी ता. रेणापुर जि. लातुर,
 पळुन गेलला इसम
 7) महेश लंके वय-३५ वर्षे ह.मु. पार्वती मंगलकार्यालयाच्या पाठीमागे कव्हा नाका लातुर, असे बेकायदेशिर रित्या स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी तिरंट नावाचा जुगार खेळत असताना मुद्देमालासह मिळुन आले आहेत. 
             तसेच यातील इसमांना जुगार खेळण्यासाठी जागा उपलब्ध करुन देवुन सदर जुगार चालवणारा इसम नामे 
8) सोमनाथ दत्त रा. विठ्ठलनगर, आर्वी, ता. जि. लातुर हे जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, व मोबाईल असे एकुण 5,69,000/-रुपयाच्या मुद्देमालासह मिळुन आले आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत

              सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे , पोलिस अंमलदार युवराज गिरी, सिद्धेश्वर मदने, जमीर शेख, राहुल कांबळे, काकासाहेब बोचरे यांनी केली आहे.
Previous Post Next Post