महाराष्ट्रातील सामाजिक संघटनांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यांच्याशी सकारात्मक चर्चा
वज्रमुठ – सर्व महाराष्ट्रातील सामाजिक संघटनांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यांच्याशी सकारात्मक चर्चा
राज्यातील वाढत्या अन्याय, अत्याचार,सामाजिक असंतोष, शेतकरी आणि घटनात्मक मूल्यमापनाच्या पार्श्वभूमीवर "वज्रमुठ – सर्व महाराष्ट्रातील सामाजिक संघटना" या व्यासपीठाच्यावतीने मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आज सह्याद्री अतिथीगृह,मुंबई येथे सविस्तर चर्चा झाली.या बैठकीवेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते यावेळी राज्यभरातून आलेल्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री महोदयांसमोर प्रमुख मागण्या व एक विशेष प्रस्ताव मांडले.
या चर्चेचा सकारात्मक प्रतिसाद देत,मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांनी पुढील आश्वासने दिली:
🔹गुन्हेगारांवर कठोर कारवाई – ज्या प्रकरणांमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आहे.त्यातील दोषींवर कडक कारवाई केली जाईल,असे त्यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देण्याचे आश्वासन दिले.
🔹शेतकरी कर्जमाफी – शेतकऱ्यांची एक वर्षाची संपूर्ण कर्जमाफी तात्काळ केली जाईल,तसेच पुढील दहा वर्षांत शेतकऱ्यांना सक्षम करणारे आर्थिक धोरण सरकारच्या वतीने राबवले जाईल,असा शब्द मा.मुख्यमंत्री महोदयांनी दिला.
🔹नवीन महामंडळाची घोषणा –क्रांतीसुर्य स्व.अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या नावाने नवीन महामंडळ स्थापन करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले, ज्यातून सामाजिक बांधिलकी जपली जाईल.
🔹लोकप्रतिनिधी मार्गदर्शन शिबीर – रमी खेळणाऱ्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर योग्य ती कारवाई होईल.
ही बैठक संघर्ष नव्हे तर संवादासाठी होती आणि त्यातून जनतेच्या प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्यासाठी सरकार सकारात्मक आहे,असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी दिला
वज्रमुठ व्यासपीठ सरकारला पुढील काळात जनतेचा आवाज पोचवण्याचे कार्य करत राहील,मात्र जर दिलेली आश्वासने वेळेत पूर्ण झाली नाही तर घटनात्मक चौकटीत आंदोलक स्वरूपात सर्व संघटना पुन्हा एकत्र येतील याचा पुनरुच्चारही यावेळी करण्यात आला.
यावेळी या शिष्टमंडळात अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील,स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष माधवराव देवसरकर, क्रांतिवीर छवा सेना अध्यक्ष करण गायकर, मराठा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजेश मोरे,
अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे , मच्छिंद्र चिंचोले ,
राधेश्याम पवळ, दशरथ कपाटे,विजय उगले,अविनाश कदम,सुनील कदम सुभाष कोल्हे ,सदा पुयड ,दिलीप गवळी मनीष तिवडे, योगेश पाटील , गणेश कपाटे, साई पाटील शंकर जाधव आदींसह शिष्टमंडळात महाराष्ट्रातील पदाधिकारी उपस्थित होते.
Tags:
MUMBAI