Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

विना-परवानगी जाहिरात बॅनर, फ्लेक्स, होर्डिंग्ज, पोस्टर्स इ. छपाई करणा-यांविरोधात मनपा करणार कार्यवाही

विना-परवानगी जाहिरात बॅनर, फ्लेक्स, होर्डिंग्ज, पोस्टर्स इ. छपाई करणा-यांविरोधात मनपा करणार कार्यवाही

  



लातूर /प्रतिनिधी : लातूर शहर महानगरपालिकेमध्ये श्रीमती. मानसी, भा.प्र.से., आयुक्त, मनपा लातूर यांच्या अध्यक्षतेखाली दि. २४.०६.२०२५ रोजी लातूर शहरातील प्रिंटींग प्रेस धारकांची बैठक पार पडली.

सदर बैठकीमध्ये आयुक्त यांनी मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे चालू असलेल्या जनहित याचिका क्रं. १५५/२०११ मधील आदेशाच्या अनुषंगाने सूचना दिल्या आहेत. तसेच लातूर शहरामधील प्रिंटींग प्रेसमध्ये लातूर शहर महानगरपालिकेची परवानगी असल्याशिवाय बॅनर, फ्लेक्स, होर्डिंग्ज, पोस्टर्स इ. छपाई करताना आढळल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल व बॅनर, फ्लेक्स, होर्डिंग्ज, पोस्टर्स इ. छपाई करताना अर्जदाराचे नाव, परवानगी क्रमांक, परवानगी दिलेले ठिकाण, परवानगीचा कालावधी इ. माहिती असणारा QR कोड छापणे बंधनकारक असले बाबत सूचना दिलेल्या आहेत.

सदर बैठकीमध्ये, पोलीस उपअधिक्षक रणजित सावंत, उपायुक्त, मनपा डॉ. पंजाबराव खानसोळे, व लातूर शहरातील सर्व पोलीस स्टेाशनचे पोलीस निरिक्षक, अतिक्रमण विभाग प्रमुख रवि कांबळे, शुभम बावणे व प्रिंटींग प्रेसधारक हे उपस्थित होते.


Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post