Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

मनपाची अतिक्रमण हटाव मोहीम पदपथानी घेतला मोकळा श्वास४० अतिक्रमणे हटवली

मनपाची अतिक्रमण हटाव मोहीम पदपथानी घेतला मोकळा श्वास४० अतिक्रमणे हटवली

 







 लातूर /प्रतिनिधी : मनपाच्या नूतन आयुक्त श्रीमती मानसी यांच्या पुढाकारातून सोमवारी (दि. २३)

अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली. या अंतर्गत गांधी चौकापासून गंजगोलाईपर्यंतची ४० अतिक्रमणे हटवण्यात आली.यामुळे पदपथांनी मोकळा श्वास घेतल्याचे पहावयास मिळाले.

           शहरातील पदपथावर झालेली अतिक्रमणे हटविण्यासाठी आयुक्त श्रीमती मानसी यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी दिनांक २३ ते ३० जून या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. पोलीस बंदोबस्तात ही मोहीम राबविण्यात येत असून त्यासाठी पोलीस अधीक्षकांनी फौजफाटा पुरवला आहे.

          सोमवारी या मोहिमेचा प्रारंभ झाला. शहराच्या मुख्य रस्त्यावरील दोन्ही बाजूंच्या फुटपाथवर झालेली अतिक्रमणे या मोहिमेत काढण्यात आली. एकूण ४० अतिक्रमणे मनपाच्या पथकांनी हटवली.

  या मोहिमेत अतिक्रमण विभाग प्रमुख रवी कांबळे, दत्ता पवार, बंटी उबाळे,आतिश गायकवाड, सुनील कांबळे, महेंद्र घोडके व कर्मचारी तसेच गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक डी.जी.चित्ते, कर्मचारी दत्ता शिंदे यांच्यासह सहकाऱ्यांनी सहभाग घेतला.

          मनपाच्या वतीने आठवडाभर ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत सर्वच अतिक्रमणे काढली जाणार आहेत. ज्या व्यावसायिकांनी फुटपाथवर दुकाने थाटली आहेत किंवा अतिक्रमणे केली आहेत त्यांनी आपली अतिक्रमण तात्काळ काढून घ्यावीत. अन्यथा मनपाच्या वतीने कारवाई करून ही अतिक्रमणे हटवली जातील, असा इशारा पालिकेच्या वतीने देण्यात आला आहे.

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post