भारतीय जनता पार्टीच्या लातूर शहर जिल्हाध्यक्षपदी अजित पाटील कव्हेकर यांची वर्णी
लातूर
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण, मराठवाडा संघटनमंत्री संजय कोंडगे, भाजपाचे सरचिटणीस विक्रांत पाटील, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष अनुप मोरे, लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले, जिल्ह्याचे नेते संभाजीराव पाटील निलंगेकर, भाजपा नेते तथा किसान मोर्चा गुजरात व गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर, आ.अभिमन्यू पवार, आ.रमेशअप्पा कराड आदी मान्यवरांच्या सुचनेनुसार व भाजपाचे माजी शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे, भाजपा नेत्या अर्चनाताई पाटील चाकूरकर, भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बस्वराज पाटील मुरूमकर, भाजपाचे माजी शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, गुरूनाथ मगे, शैलेश गोजमगुंडे यांचे मार्गदर्शन व योगदानातून भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रच्या लातूर शहर जिल्हाध्यक्षपदी युवा नेते अजित पाटील कव्हेकर यांची निवड झालेली आहे. त्यांची ही निवड भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रचे प्रदेश निवडणूक अधिकारी आ.चैनसुख संचेती यांनी केली आहे. या संबंधीचे निवडपत्र त्यांना प्रदान करण्यात आलेले आहे.
भाजपा युवा नेते अजित पाटील कव्हेकर यांनी आपल्या पक्षीय कार्यकालामध्ये लातूर शहरातील पाण्याचा प्रश्न, कचर्याचा प्रश्न, शहरातील पार्कींगची गैरसोय याबाबत आवाज उठवून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचे काम केले. तसेच पक्षीय संघटनामध्येही महत्त्वाची भूमिका घेत भाजपा युवा मोर्चा लातूर शहर जिल्हा व युवा वॉरियर्सच्या माध्यमातून राज्यात सर्वात मोठे संघटन उभे करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. याबरोबरच पक्ष श्रेष्ठींच्या आदेशानुसार विविध कार्यक्रम घेऊन पक्ष वाढीसाठी मोठे योगदान दिलेले आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन भाजपाचे सरचिटणीस विक्रांतदादा पाटील, भारतीय जनता युवा मोर्चा माजी प्रदेशाध्यक्ष राहूल लोणीकर व विद्यमान युवा प्रदेश अध्यक्ष अनुप मोरे यांनी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी अजित पाटील कव्हेकर यांची निवड करून त्यांना राज्यामध्ये काम करण्याची संधी दिली. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी सक्षम आणि युवा नेतृत्त्व म्हणून अजित पाटील कव्हेकर यांना भारतीय जनता पार्टीच्या लातूर शहर जिल्हाध्यक्षपदी काम करण्याची संधी देण्यात आलेली आहे. या संबंधीचे पत्र प्रदेश निवडणूक अधिकारी आ.चैनसुख संचेती यांनी दिले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सुरेश जाधव, निर्मलाताई कांबळे, राहुल भूतडा, रोहित पाटील, विशाल हवा पाटील, काका चौगुले, गोपाळ वांगे, सचिन सुरवसे, रंजितसिंह पाटील कव्हेकर, विश्वजीत पाटील कव्हेकर, अनिताताई कदम, अॅड गणेश गोजमगुंडे, रविशंकर लवटे, संतोष तिवारी, सागर घोडके, नगरसेविका रागिणीताई यादव, बालाजी शेळके, अंतु गायकवाड, रवी सुडे, स्वामी घोरपडे, प्रा.सतीश यादव, नितीन सराफ, सुजित साखरे, संगिता शिंदे, संजय गिर, राहुल भूतडा, महेश झंवर, गणेश गोजमगुंडे, आकाश जाधव, शशिकांत हांडे, ज्ञानेश्वर पाटील, डी.एस.पवार, अजित नानजकर, गणेश गायकवाड, सागर लोंढे, सूदर्शन येमे, विश्वनाथ सूरवसे, मुन्ना हाश्मी, आण्णा मेनकुदळे, गणेश खाडप, कव्ह्याचे माजी सरपंच नेताजी मस्के, धनंजय हाके, संतोष ठाकूर, आकाश बजाज, बाळासाहेब शिंदे, शिवाजी कामले, आकाश पिटले, अनिरूध्द पाटील,महादेव यनकफळे, बापूसाहेब गोरे, विनोद जाधव, गजेंद्र बोकन, ऋषिकेश इगे, युवराज उफाडे, प्राचार्य लक्ष्मिकांत गौंड, दयानंद हासबे, सूर्यकांतराव शेळके, सुभाषअप्पा सुलगुडले, महादेव गायकवाड, उध्दवराव जाधव, गणेश पवार, सूरेशअण्णा सूर्यवंशी, सूर्यकांत चव्हाण, निशिकांत मजगे, रघुनाथ बाहेती, आकाश पिटले, अॅड.पंकज देशपांडे, लालासाहेब पाटील, आशिष बोंडगे, अमर पाटील, गणेश नांगराळे, गणेश पवार, स्वराज यादव, सालार शेख, मंदार कुलकर्णी, प्रविण जाधव, विक्रम पाटील, बालाजी शेळके, आश्विन कांबळे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते यांनी त्यांचे अभिनंदन केले.