डिजिटल मीडिया पत्रकारांसाठी शासनाचा मोठा निर्णय;
डिजिटल मीडियावरील सर्वच माध्यमांना मिळणार शासनाच्या जाहिराती
मुंबई - डिजिटल मीडियावर काम करणाऱ्या सर्वच डिजिटल पत्रकारांना शासन दरबारी हक्काच्या जाहिराती मिळाव्यात यासाठी सर्व पत्रकार संघटना सातत्याने पाठपुरावा करत होत्या अखेर या संघटनात्मक पाठपुराव्याला यश आले असून राज्य सरकारने 3 जून 2025 रोजी एक शासन निर्णय जाहीर करून डिजिटल मीडियावरील फेसबुक,युट्युब आणि इन्स्टाग्राम या माध्यमातून पत्रकारिता करणाऱ्या डिजिटल पत्रकारांना हक्काचा रोजगार देण्यासाठी शासकीय जाहिराती सुरू केल्या आहेत. गेल्या अनेक दिवसापासून संघटना डिजिटल मीडिया यासाठी सातत्याने विविध मंत्र्यांना भेटून डिजिटल मीडियाबद्दलची सखोल माहिती देत होते आणि डिजिटल मीडियाच्या माध्यमातून कशा पद्धतीने शासनाच्या जाहिराती लोकप्रिय होतील याबद्दल सांगत होते. अखेर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्वच मंत्र्यांनी एकमत दाखवत डिजिटल माध्यमांना जाहिराती सुरू करण्याचा एक मोठा निर्णय घेतला आहे. शासनाने घेतलेल्या या निर्णयाचे संपुर्स्वाण महाराष्ट्रातून डिजिटल माध्यमांकडून कौतूक करण्यात येत असून
डिजिटल मिडिया मध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका मिळावी यासाठी सुध्दा संघटना काम करत आहेत आणि ते लवकरच पुर्ण होईल यात काही शंका नाही.