राज्यातील २१ शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या
लातूर सहसंचालक दत्तात्रय मठपती यांची बदली लातूरच्या माध्यमिक शिक्षणाधिकारीपदी
लातूर : शालेय शिक्षण व क्रीडा विभागानेतीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या २६ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. बदल्यांचे आदेश ३० मे रोजी जारी करण्यात आले. त्यानुसार २१ अधिकाऱ्यांची बदली झाली आहे, तर तीन अधिकाऱ्यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. बदल्या रद्द करण्यासाठी कुठल्याही स्वरूपाची मागणी केल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असेही बजावले आहे.
जालन्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ यांची बदली महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेत प्रशासन अधिकारी म्हणून करण्यात आली आहे. पालघरच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी संगीता
भागवत यांची बदली जालन्याच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पदावर झाली आहे.
लातूर विभागाचे विभागीय सहसंचालक दत्तात्रय मठपती यांची बदली लातूरच्या माध्यमिक शिक्षणाधिकारीपदी, बीडचे माध्यमिक शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांची बदली अमरावती येथील आदिवासी विकास आयुक्तालयात शिक्षणाधिकारीपदी, लातूरच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांची बदली नांदेडच्या प्राथमिक शिक्षणाधिकारीपदी तर नांदेडच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी सविता बिरगे-वाडीयार यांची बदली परभणीच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून झाली आहे. परभणीच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी आशा गरूड यांची बदली रायगड जिल्हा
परिषदेत योजना विभागाच्या शिक्षणाधिकारीपदी, जालन्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी मंगल धुपे यांची बदली जळगाव जि.प.च्या प्राथमिक शिक्षणाधिकारीपदी, ठाण्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी ललिता दहितुले-कावडे यांची बदली महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था, छत्रपती संभाजीनगर येथे प्रशासकीय अधिकारीपदी, लातूरच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी नागेश मापारी यांची बदली धाराशिव जि.प.च्या योजना विभागाच्या शिक्षणाधिकारीपदी, अमरावती विभागीय मंडळाचे सहसचिव तेजराव काळे यांची नियुक्ती परभणी जिल्हा परिषदेत योजना विभागाचे शिक्षणाधिकारी म्हणून करण्यात आली आहे.