Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

कला केद्राचा नंगा नाच..! सांस्कृतिक कला केंद्रांमध्ये सध्या तबला पेटीच्या जागी ‘डीजे’

कला केद्राचा नंगा नाच..!
सांस्कृतिक कला केंद्रांमध्ये सध्या तबला पेटीच्या जागी ‘डीजे’


लातूर,  : राज्य सरकारद्वारे परवाना मिळालेल्या लातूर जिल्ह्यात रेणापूर आणि बुधोडा सह महाराष्ट्रातील सांस्कृतिक कला केंद्रांमध्ये तबला पेटीच्या जागी ‘डीजे’चा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यामुळे राज्यातील दहा हजारांहून अधिक कलावंतांवर उपासमारीची वेळ येत आहे. या विषयात गांभीर्याने लक्ष घालून सरकारने अशा कला केंद्रांवर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे विशेष म्हणजे अश्या कला केंद्रावर व्यश्याव्यवसाय ही तितक्याच जोरात चालू आहे त्यामध्ये अल्पवयीन मुलींनाही जाळयात ओढले जात आहे.यावर पोलिसांसोबत महसुल अधिकारी यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत आहे.

 ‘‘महाराष्ट्राची कला आणि संस्कृती टिकली पाहिजे या उद्देशाने हे सांस्कृतिक कला केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. राज्यामध्ये तब्बल ८२ सांस्कृतिक कला केंद्रे आहेत. यामध्ये नृत्यांगनांसह गायक, तबला, ढोलकी, पेटी यांचे वादन करणाऱ्या कलावंतांचा समावेश असावा असा नियम आहे. मात्र, नियम धाब्यावर बसवून साधारण महाराष्ट्रासह लातूर मधील तब्बल ४८ केंद्रांमध्ये ‘डीजे’चा सर्रास वापर केला जात आहे. त्यामुळे तबला, ढोलकी, पेटी वादकांसह गायक हे कलावंत गायब झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे अशा कलाकेंद्रावर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी होताना दिसत आहे.

लातूर ला नवे पोलिस अधिक्षक अमोल तांबे यांची नियुक्ति

विशेष म्हणजे लातूर मधील रेणापूर आणि औसा( लोदगा )येथील कलाकेंद्रावर तर नुसता नंगानाच चालू आहे या कला केंद्रावर पोलिस प्रशासनासह महसुल अधिकार्यांनी आपली ईज्जत खुंटीवर टांगुन ठेवली आहे.सकाळीपासून या केंद्रावर येणार्यांची संख्या मोठ्याप्रमाणावर असून ते दिवस उजाड़े पर्यंत त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कोणताच पोलिस आणि महसूल अधीकारी पुढे येवून कार्यवाही करण्यास धजावत नाही किंबहुना कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई अद्याप झालेली नाही. आता लातूर ला नवे पोलिस अधिक्षक अमोल तांबे यांची नियुक्ति झाली आहे ते या गंभीर प्रकरणाकडे पाहतीलचं यात काही शंका नाही मात्र त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे अवैध धंद्यावर करडी नजर असलेला धुरंधर अधिकारी सुधाकर बावकर यांची लातूर स्थानिक गुन्हेशाखेच्या पोलिस निरिक्षक पदी निवड झाल्याने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहतील व अश्या अनधिकृत पणे काम करणार्यावर कार्यवाही करतील यात शंका नाही.

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post