२५ हजारांची लाच मागीतल्या प्रकरणी; एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पीएसआय रजपूत फरार
प्रतिनिधी । लातूर
गोरगरिबांना लूटून किल्लारीवरून बदली होवून आलेला हा रजपूत आता लातूरमध्येही गोरगरिब जनतेला या ना त्या कारणाने प्रकरणांमध्ये लुटत होता हे आता या प्रकरणावरुन स्पष्ट होत आहे.अटकपूर्व जामीन अर्जामध्ये तक्रारदाराच्या बाजूने उच्च न्यायालयात रिपोर्ट देण्यासाठी व गुन्ह्यात मदत करण्यासाठी तसेच हजेरी कमी करण्यासाठी मदत करतो म्हणून शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस उपनिरिक्षक प्रशांतसिंह रघुनाथसिंह रजपूत (रा. पोतदार शाळे जवळ, लातूर, मुळ रा. हिंगोली ) याने २५ हजारांची लाच मागितली. परंतु संशय आल्याने लाचेची रक्कम न स्विकारता ठाण्यातून पळून गेल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत त्याच्या विरोधात गुन्हादाखल करण्यात आला आहे.
एका गुन्ह्यात आरोपी असलेल्या तक्रारदाराला न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्जासाठी मदत होईल असा रिपोर्ट देण्यासाठी, गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी तसेच हजेरी कमी करण्यासाठी मदत करण्याचा शब्द देत रजपूत याने तक्रारदराकडे २५ हजार रुपयांच्या लाचेची १५ मे रोजी मागणी केली होती. त्यानंतर लातूरच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागास तक्रार प्राप्त होताच दि. १९ आणि २६ मे, रोजी तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यावेळी तक्रारीत तथ्य आढळून येताच केमिकल टाकलेल्या नोटांची रक्कम देवून दि. २८ मे रोजी एमआयडीसी पोलिसांत सापळा लावण्यात आला. परंतु संशय पक्का होताच त्याने ठाण्यातून पळ काढला. तो फरार आहे.
घराची झडती सुरू... हिंगोलीच्या घरीही धडकले पथक प्रशांतसिंह
रघुनाथसिंह रजपूत याच्या विरोधात गुन्हा दाखल होताच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे एक पथक शहरातील पोतदार इंटरनॅशनल स्कुल जवळ असलेल्या घरी पोहोचले. रात्री उशिरापर्यंत या पथकाकडून घराची झडती सुरू होती. तसेच, राजपूर च्या हिंगोली येथील मुळ घरीही लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक धडकले असुन तेथेही घर झडती सुरू होती.