मोटेगावकर सरांच्या RCC ची १ जून रोजी रिपीटर्स बॅच साठी स्कॉलरशिप परीक्षा
-२ जूनपासून सुरू होणार रिपीटर्स आणि ११ वी च्या बॅचेस
विद्यार्थ्यांनी आपण डॉक्टर होणाऱ्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी प्रा. मोटेगावकर सरांच्या RCC ने पुन्हा एकदा विडा उचलला असून NEET-२०२६ ची तयारी करण्यासाठी रिपीटर बॅच २ जूनपासून तर १० वितून ११ वीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा बेसिक फाऊंडेशनसह दुसरी बॅच २ जून पासून सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने रिपीटर बॅचसाठी १ जून रोजी RCC-SET स्कॉलरशिप परीक्षा आयोजित करण्यात आली असून या परीक्षेत गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांना फीस मध्ये भरघोस सवलतीसह प्रवेश मिळणार असल्याची माहिती RCC व्यवस्थापनाने दिली आहे.
मागील तब्बल २४ वर्षांपासून आपल्या उज्ज्वल आणि दैदीप्यमान निकालामुळे प्रा. शिवराज मोटेगावकर सरांचे RCC हे शैक्षणिक संकुल महाराष्ट्रातील घराघरात पोहोचले आहे. आजमितीला RCC च्या लातूर ,नांदेड, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, अकोला, पुणे (पिंपरी), पुणे (एफ. सी.रोड) ,पुणे (हडपसर) नाशिक,सोलापूर या शाखेत विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य केले जात आहे. दरम्यान, वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी अनिवार्य असलेली NEET परीक्षा नुकतीच पार पडली. यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्याना उपयोजनात्मक प्रश्नांना सामना करावा लागला,पेपर वेळखाऊ असल्यामुळे असंख्य विद्यार्थ्याना वेळ कमी पडला त्यामुळे बरेचसे विद्यार्थी संपूर्ण पेपर सोडऊ शकले नाहीत.काही विद्यार्थी परीक्षेचे प्रेशर हाताळू शकले नाहीत, काही चुका झाल्या. अशा विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न भंग होऊ नये यासाठी देशातील अग्रगण्य असलेली तसेच आपल्या गुणवत्तेचा ठसा निर्माण करणारी आणि प्रा. शिवराज मोटेगावकर सर संचालित RCC पुढे आली आहे. देशपातळीवरील सर्वोत्कृष्ट टीम सह RCC ने विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा NEET चे शिखर सर करण्यासाठी मायेचा हात देत परीक्षेची सर्वोत्तम तयारी करण्यासाठी रिपीटर आणि ११ वी NEET/ JEE/ CET बॅच ही २ जूनपासून सुरू करण्यात येणार आहे. NEET - २०२६ रिपीटर बॅचसाठी RCC-SET स्कॉलरशिप परीक्षा रविवार, दि. १ जून रोजी होणार आहे. या परीक्षेत गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांना फीस मध्ये सवलत मिळणार आहे तसेच अगोदर RCC मध्ये शिक्षण घेतलेल्या व आता रिपीट करण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्याना विशेष सवलत देण्यात येणार आहे.आरसीसी-SET स्कॉलरशिप परीक्षा NEET पॅटर्नच्या धर्तीवर ऑफलाईन पद्धतीने आरसीसी च्या सर्व शाखेत होणार आहे. या परीक्षेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना www.rccpattern.com या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे. दरम्यान, NEET-२०२५ मध्ये ४०० पेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची विशेष सवलतीसह स्वतंत्र बॅच असणार आहे. तसेच फिजिक्स विषयामुळे ज्याना पेपर खूप अवघड गेला आहे अशा विद्यार्थ्यांना JEE Mains लेव्हल च्या गणितीय प्रश्नाची तयारी करून घेतली जाणार आहे जेणेकरून विद्यार्थ्याना NEET-२०२६ चा पेपर खूप सोप्पा जाईल,असे स्वतः प्रा.मोटेगावकर सरानी सांगितले .परीक्षेचे वेळ व ठिकाण नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना SMS द्वारे पाठविण्यात येईल .तरी लवकरात लवकर RCC-SET स्कॉलरशिप परीक्षेसाठी नोंदणी करावी असे आवाहन RCC व्यवस्थापनाने केले आहे.