रेणापूर पंचायत समितीच्या कंत्राटी अधिकार्यास लाचलुचपत विभागाने बाराहजार घेताना रंगेहाथ पकडले
:-लातूर जिल्ह्यातील रेणापूर पंचायत समितीच्या ज्योतिर्लिंग बाबुराव चिखले* वय 43 वर्षे, पद सहायक कार्यक्रम अधिकारी, (कंत्राटी ) नेमणूक पंचायत समिती कार्यालय, रेणापूर ता. रेणापूर जि. लातूर रा. ग्रॅव्हिटी शाळेजवळ अग्रोया नगर लातूर
(*इलोसे, ग्रामविकास विभाग*) या अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. रोजगार हमी योजनेतील विहीर मंजुरी व नाव दुरुस्तीसाठी १५ हजार रुपयांची लाच मागितल्याच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. तक्रारदाराने ८ मे रोजी तक्रार दाखल केली होती, त्यानंतर २० मे रोजी सापळा रचून आरोपीकडून १२ हजार रुपये स्वीकारताना त्याला पकडण्यात आले.
झडती दरम्यान आरोपीकडून लाच रक्कम व मोबाईल जप्त करण्यात आला असून, त्याच्या निवासस्थानीही झडती घेण्यात आली आहे. या प्रकरणी रेणापूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई पोलीस उप अधीक्षक संतोष बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
लाचखोरीविरोधातील ही धडक कारवाई प्रशासनातील पारदर्शकतेसाठी मोठा इशारा ठरली आहे.
नागरिकांनी अशा प्रकारच्या लाचखोरीविरोधात पुढे येऊन तक्रार दाखल करावी, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे._
सापळा अधिकारी* :-
श्री. संतोष बर्गे,
पोलीस उप अधीक्षक,
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, लातूर
मो.नं.9226201064
*तपास अधिकारी* :-
श्री. संतोष बर्गे,
पोलीस उप अधीक्षक,
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, लातूर
मो.नं.9226201064
*सापळा पथक* :-
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, लातूर.
*मार्गदर्शक अधिकारी*
श्री.संदीप पालवे,
पोलीस अधीक्षक,
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,
नांदेड परिक्षेत्र,नांदेड.
मो.नं.9226484699
डॉ.संजय तुंगार,
अपर पोलीस अधीक्षक,
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,
नांदेड परिक्षेत्र,नांदेड.