Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

मंत्री पंकजाताई मुंडे,आ. धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत ब्राह्मण सभेचा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा !

मंत्री पंकजाताई मुंडे,आ. धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत २ मे रोजी परळीत ब्राह्मण सभेचा ४५ वा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा !

_प. पु. मकरंद महाराज, भागवतमर्मज्ञ ह.भ.प बाळुमहाराज उखळीकर यांच्यासह संत व विद्वतजणांची लाभणार उपस्थिती_









परळी वैजनाथ, प्रतिनिधी ...
  परळी वैजनाथ येथे २ मे रोजी ब्राह्मण बहुद्देशीय सभा आयोजित ४५ वा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा होणार असुन या सोहळ्यात २० बटुंवर वेदोक्त पद्धतीने सामुदायिक उपनयन संस्कार करण्यात येणार आहेत. दत्तधाम परभणीचे पिठाधिपती प. पु. मकरंद महाराज, भागवतमर्मज्ञ ह.भ.प बाळुमहाराज उखळीकर यांच्यासह संत व विद्वतजणांची आशिर्वचनपर उपस्थिती तसेच मंत्री पंकजाताई मुंडे,आ.धनंजय मुंडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
        ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वैजनाथ आयोजित ४५ वा उपनयन सोहळा मिती वैशाख शु. ५ शके १९४७ शुक्रवार दि. २ मे २०२५ वेळ : सकाळी १०.३१ वा. प्रवचनमंडप, वैद्यनाथ मंदीर जवळ, परळी वैजनाथ येथे शानदार आयोजनाने पार पडणार आहे.या सोहळ्यात परभणीचे पिठाधिपती प. पु. मकरंद महाराज,प्रसिद्ध भागवताचार्य व किर्तनकार भागवतमर्मज्ञ ह.भ.प बाळुमहाराज उखळीकर यांचे शुभाशिर्वाद लाभणार असुन राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन
मंत्री पंकजाताई मुंडे, माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. मराठवाड्यातील विविध ठिकाणच्या २० बटुंवर सामुदायिक उपनयन संस्कार करण्यात येणार आहेत. 
        तरी या शुभसोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहवे असे आवाहन ब्राह्मण बहुउद्देशीय सभेच्या वतीने करण्यात आले आहे.

 ● *२० बटुंचा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा*
 
१.सर्वेश निलेश जयराम परळी वैजनाथ
२.श्रीयश राजाभाऊ खिस्ते परळी वैजनाथ
३.समर्थ सचिन तेरकर परळी वैजनाथ
४.सर्वेश प्रशांत तुळशी परळी वैजनाथ 
५.अश्विन जतीन देशपांडे परळी वैजनाथ
६.साईदीप सचिन कुलकर्णी सिरसाळा
७.अथर्व अनंतराव वकील लातूर
८.निलेश विपिन देशपांडे छ. संभाजीनगर
९.कृष्णा भगवान कुलकर्णी सोनपेठ
१०.मयूर रंगनाथ कुलकर्णी सोनपेठ
११.गोपाळ प्रशांत क्षीरसागर जिंतूर
१२.कृष्णा प्रशांत क्षीरसागर जिंतूर
१३.चैतन्य उमाकांत जोशी नांदेड
१४.कुणाल उमाकांत जोशी नांदेड
१५.निरज नंदेश घोन्सीकर ताडकळस १६.निखिल नंदेश घोन्सीकर ताडकळस १७.मंगेश महेश कुलकर्णी सिंधगाव १८.तन्मय महेश कुलकर्णी सिंधगाव १९.अथर्व सदानंद जोशी उदगीर
२० प्रथमेश मुदगलराव कुलकर्णी मुदगल


Previous Post Next Post