माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा वाढदिवस लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने विविध सामाजिक उपक्रमाने केला साजरा
लातूर प्रतिनिधी:
राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शुक्रवार दि. १८ एप्रिल रोजी सकाळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या विविध पदाधिकाऱ्यांनी लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कामगारांना उन्हापासून संरक्षणासाठी कॅप वाटप केल्या त्यानंतर ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिरात जाऊन श्री चा अभिषेक करून आरती केली.
त्यानंतर ग्रामदैवत सुरत शहावली दर्गा येथे चादर अर्पण केली व गंजगोलाई येथील आई जगदंबेच्या मंदिरात जाऊन जगदंबा मातेची आरती केली.
यानंतर कोल्हे नगर येथे नेत्रा रोग तपासणी शिबिर घेण्यात आले व गरजू रुग्णांना चष्मे वाटप करण्यात आले.
यावेळी लातूर ग्रामीणचे माजी आमदार व विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन वैजनाथ दादा शिंदे,रेणा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन आबासाहेब पाटील,शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड.किरण जाधव, गोरोबा लोखंडे,ॲड समद पटेल, ॲड कालिदासराव देशपांडे, सचिन बंडापल्ले,दगडूप्पा मिटकरी, चंद्रकांत धायगुडे, कैलास कांबळे, ॲड फारूक शेख,अशोक भोसले, संभाजी सूळ, पृथ्वीराज सिरसाठ, विजयकुमार साबदे, बाप्पा मार्डीकर ,आसिफ बागवान,संजय मेहत्रे,ॲड किसनराव शिंदे, ॲड गोपाळ बुरबुरे,यशपाल कांबळे,अभिषेक पतंगे, नबी नळेगावकर, विष्णुदास धायगुडे, बालाजी झिपरे,पवन सोळंकर,अभिजित इगे,कुणाल वागज, तनुजाताई कांबळे, खाजापाशा शेख, जफर पटवेकर,तबरेज तांबोळी, रईस टाके, अमोल गायकवाड, धावारे,ॲड गणेश कांबळे,लक्ष्मण मोरे,पवनकुमार गायकवाड, मैनुभाई शेख, प्रमोद जोशी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.