नाव,पैसा प्रतिष्ठा असूनही आत्महत्या का करतात समृद्ध आणि प्रसिद्ध लोक..
आपल्याला वाटतं की पैसा, प्रसिद्धी, समाजात मान-सन्मान मिळाला की माणूस आनंदी असतो, त्याचं जीवन सुरक्षित असतं. पण सध्याच्या घटनाक्रमाकडे पाहिलं तर ही समजूत चुकीची वाटते. अगदी उच्चशिक्षित, प्रतिष्ठित, समृद्ध लोक जे समाजात मार्गदर्शक म्हणून पाहिले जात होते – त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं आहे कठिण च्या कठिण परिस्थितीला सामोरे जाण्याची माणसिक स्थिती खालावली आहे.प्रसंगाला तोंड देण्यापेक्षा आत्महत्येसारखे पाऊल उचलून मार्ग काढत आहेत हे अतिशय दुर्दैवी आहे.प्रत्येक माणव जातीला १००वर्ष आयुष्य लाभलेले आहे मरण आणि जन्म वेळ,काळ,श्रीमंत,गरिब पाहून येत नाही त्यामुळे जेवढा वेळ आपल्या कडे आहे तेवढा वेळ पैशापेक्षा कुटुंबाला देणे अवश्यक आहे.पुन्हा हे कुटुंब भेटेल याची शास्वती नाही किंबहुना ते भेटणारही नाही, याचा महिलांनीही तेवढाच विचार करायला हवा.आपण आपल्या मुलांना कृत्रिम शिक्षणापेक्षा वास्तविक जीवनामध्ये जगण्यासाठी सक्षम करावे जेणेकरुन अशा घटना कमी होतील.आपण येतानाही एकटेच असतो आणि जातानाही एकटेच असतो मग एवढा पैसा प्रापर्टी, प्रतिष्ठा कोणासाठी कमावतो या प्रश्नाचे उत्तर आजुनपर्यंत भेटलेले नाही.
नैसर्गिक मृत्यु चे प्रमाणापेक्षा कृत्रिम मृत्यु चे प्रमाणात वाढ होणे हे मानवाच्या दृष्टीने घातक वाटचाल असल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे.पैशासाठी जीव घेणे आणि देणे हे घातक वाटचाल सध्या चालू आहे.
अलीकडच्या काही घटना:
डॉ. वळसणकर (सोलापूरचे न्युरोसर्जन): कालच आत्महत्या केली. एक यशस्वी डॉक्टर, समाजात मान असलेली व्यक्ती.
बाबासाहेब मनोहरे (लातूरचे मनपा आयुक्त): स्वतःवर गोळी झाडली, सध्या अत्यवस्थ.
भैयू महाराज: प्रसिद्ध आध्यात्मिक गुरु, समाजसेवक – पण अचानक आत्महत्या.
डॉ. शीतल आमटे: बाबा आमटे यांचं वारसत्त्व पुढे नेणाऱ्या, अत्यंत बुद्धिमान आणि प्रगल्भ विचारसंपन्न सामाजिक कार्यकर्त्या.
सुशांत सिंह राजपूत: प्रतिभावान कलाकार, त्याच्या आत्महत्येने सारा देश हादरला.
Virtual World vs Real Life:
यामध्ये विशेष विचार करायला लावणारा आहे. त्यांचं social media presence खूप प्रभावी होतं – Facebook, YouTube वर हजारो followers, त्यांचे विचार, ऊर्जा, आणि समाजहिताचे व्हिडिओ अनेकांना प्रेरणा देणारे होते.
पण या virtual जगात जेवढं कौतुक, तेवढंच त्यांच्या वास्तव आयुष्यात एकटेपण होतं. घरातील नातेसंबंध, विचारांचे मतभेद, किंवा अव्यक्त अस्वस्थता – या सर्व गोष्टी त्या व्हर्च्युअल कौतुकामागे दडलेल्या असतात हा विरोधाभास मनाला पोखरतो.
Virtual World म्हणजे काय?
Followers म्हणजे खरी साथ नसते.
लाइक्स, कमेंट्स, views हे तात्पुरते समाधान देतात...
का घडतं असं?
1. मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष:
डिप्रेशन, ऍन्झायटी, बर्नआउट हे सilent killers आहेत. समाजात प्रतिष्ठा जपताना हे कुणालाही सांगता येत नाही.
2. एकटेपण आणि आंतरिक संघर्ष:
गोंधळातही माणूस एकटा असतो. virtual जगात सक्रिय असूनही, घरात किंवा मनात असलेली पोकळी फार त्रासदायक असते.
3. समाजाच्या अपेक्षा आणि दबाव:
तू इतका मोठा आहेस, तुला काय कमी
4. वैयक्तिक आयुष्यातील तणाव:
कौटुंबिक मतभेद, नात्यातील क्लेश.
5. मोठ्या जबाबदाऱ्यांचं ओझं:
आपण काय शिकायला हवं?
मानसिक आरोग्यावर खुलेपणानं बोलणं.
केवळ virtual जगात न अडकता खरे नातेसंबंध जपणं.
आपल्या जवळच्या लोकांच्या मनात काय चाललंय याकडे लक्ष देणं.
एखादं व्यक्तिमत्व खूप प्रेरणादायी वाटतंय, त्याचा अर्थ तो माणूसही एकदम ठिक आहेच असं मानू नका
शेवटी, माणूस मनाने आनंदी असावा लागतो – ना की बँक बॅलन्सने, ना फॉलोअर्सनी.
Virtual World मध्ये कितीही ‘लाइव्ह’ दिसत असलो, खरे जीवन कधी कधी ‘म्युट’ असतं...