डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमीच्या पुरस्काराचे थाटात वितरण
लातूर -डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमीच्या वतीने राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार वितरण व साहित्य संमेलन थाटात झाले डॉक्टर भालचंद्र ब्लड बँक लातूर येथे सकाळी 11 ते 4:30 पर्यंत संमेलनाचेसञ चालु होते उद्घाटन अॕड एस एन गायकवाड यांच्या हस्ते तर अध्यक्ष म्हणुन डॉक्टर माधव गादेकर यांच्या उपस्थितीत संमेलनाच्या उद्घाटन झाले त्यानंतर कथाकथन सत्रात जी जी कांबळे प्रकाश घादगिने सौ,वृशाली पाटील यांच्या बहारदार कथा सादर झाल्या कवी संमेलनात योगीराज माने, नरसिंग इंगळे ,रामदास कांबळे, दिलीप लोभे ,छगन घोडके, शैलजा कारंडे, डा.नयन राजमाने ,सारिका बेद्रे ,डॉक्टर संजय जमदाडे ,प्रदीप कांबळे, प्राध्यापक रामकिशन संमुखराव, दिलीप गायकवाड, आदी कवींच्या कविता सादरीकरण झाल्या योगीराज माने यांच्या नातवाचे हात या कवितेला सभागृहात भरून दाद देण्यात आली सर्वच कवींच्या कवितामुळे कवी संमेलन सुद्धा रंगात आले समारोपाचे मुख्य अतिथी प्राचार्य डॉक्टर राजकुमार मस्के महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय उदगीर यांनी साहित्यिकांची प्रशंसा गौरोव केले सकस साहित्य निर्माण झाले पाहिजे व समाजाला साहित्यिकांची आवश्यकता आहे त्यामुळे लिहित्या हाताने लिहिले पाहिजे असा संदेश देत सर्वांना मंत्रमुक्त केले डॉक्टर राजकुमार मस्के, डॉक्टर माधव गादेकर, एडवोकेट एस एन गायकवाड प्रकाश घादगिने यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय पुरस्काराचे थाटात वितरण झाले महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून आलेले पुरस्कारार्थी कार्यक्रमाने भारावून गेले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रकाश घादगिने ,डॉक्टर माधव गादेकर,अर्जुन कांबळे ,शिवाजी गायकवाड, संजय जमदाडे. यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक रामकिशन समुखराव यांनी केले तर आभार प्रकाश घादगिने सचिव डॉ बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी यांनी मानले.