चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांच्या हस्ते विलास साखर कारखाना युनीट २ चे बॉयलर अग्निप्रदिपन
लातूर प्रतिनिधी २२ आक्टोंबर २२ :
लातूर जिल्हयातील उदगीरसह जळकोट, चाकूर, शिरुर ताजबंद व अहमदपुर येथील शेतकरी ऊसउत्पादकांच्या प्रगतीसाठी महत्वाचा असलेला तोंडार येथील विलास साखर कारखाना युनीट – २ चे बॉयलर अग्निप्रदिपन चेअरमन वैशाली विलासराव देशमुख व सर्व संचालकांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांनी गळीत हंगाम यशस्वीतेसाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
शनिवार दि. २२ आक्टोबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता उदगीर तालुक्यातील तोंडार येथील विलास सहकारी साखर कारखाना लि. युनीट २ चे कारखान्याच्या चेअरमन वैशाली विलासराव देशमुख व सर्व संचालकांच्या उपस्थितीत गळीत हंगाम सन २०२२-२३ चे बॉयलर अग्निप्रदिपन करण्यात आले आहे.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजेश्वर निटुरे, उदगीर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष कल्याण पाटील, मन्मथअप्पा किडे, मारूती पांडे, व्हाईस चेअरमन रविंद्र काळे, विलास साखर युनीट २ चे कार्यकारी संचालक ए. आर. पवार, कारखान्याचे संचालक गोविंद बोराडे, युवराज जाधव, अनंत बारबोले, भैरवनाथ सवासे, गुरुनाथ गवळी, बाळासाहेब बिडवे, नारायण पाटील, अनिल पाटील, रंजित पाटील, गोविंद डूरे, सूर्यकांत सूडे, अमृत जाधव, रामदास राऊत, सुभाष माने, भारत आदमाने, संजय पाटील खंडापूरकर, दगडूसाहेब ऊर्फ ज्ञानोबा पडीले, निमंत्रीत संचालक रामराव बिराजदार, सिध्देश्वर पाटील, ज्ञानोबा गोडभरले, पंडीत ढगे, विजय निटूरे, विक्रांत भोसले, विनोबा पाटील, राजेंद्र पाटील, संतोष तिडके आदी उपस्थित होते.
विलास साखर कारखाना युनीट – २ चा गत हंगाम विक्रमी गाळपाचा ठरला आहे. या गळीत हंगामात ५ लाख ३७ हजार मे.टन ऊसाचे गाळप झाले असून ६ लाख ५५ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले तर साखर ऊतारा १२.२० इतका आहे. या हंगामात गाळप क्षमतेचा १२५ टक्के वापर करण्यात आला.
गळीत हंगाम सन २०२२-२३ हंगामाची तयारी पूर्ण झाली असून या गळीत हंगामात देखील ऊसाचे क्षेत्र मोठया प्रमाणात उपलब्ध आहे. याकरीता आवश्यक तोडणी वाहतूक यंत्रणेचे व हार्वेस्टरचे करार पुर्ण करण्यात आले आहेत. कारखाना हंगामात पुर्ण क्षमतेने चालवण्याच्या दृष्टीने कारखाना मेन्टेनन्स कामे झाली आहेत, अशी माहिती कार्यकारी संचालक ए.आर.पवार यांनी दिली.
गळीत हंगाम सन २०२२-२३ चे बॉयलर अग्निप्रदिपन चेअरमन वैशाली विलासराव देशमुख व सर्व संचालकांच्या उपस्थितीत महापूजा करून अग्निप्रदिपन करण्यात आहे. यावेळी चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांनी गळीत हंगाम सन २०२२-२३ यशस्वीतेसाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या. प्रारंभी बॉयलर अग्निप्रदिपन कार्यक्रमाची महापूजा संचालक बाळासाहेब बिडवे व सौ. सुवर्णा बिडवे आणि सर्व संचालकांच्या हस्ते करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राहूल इंगळे पाटील यांनी केले तर आभार संचालक युवराज जाधव यांनी मानले.
%20(1).jpg)
%20(1).jpg)
%20(1).jpg)
%20(1).jpg)
