Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

भूकंपाच्या पार्श्वभूमीवर हासोरी परिसरातील उपाययोजना संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

भूकंपाच्या पार्श्वभूमीवर  हासोरी परिसरातील उपाययोजना संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा




लातूर, दि. 21 : निलंगा तालुक्यातील हासोरी बु. आणि हासोरी खु. परिसरात सौम्य भूकंपाच्या नोंदी झाल्या आहेत. त्यावर उपाययोजना करण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी आढावा घेतला. याबाबतची जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, पुनवर्सनचे उपजिल्हाधिकारी नितीन वाघमारे, निलंगाच्या उपविभागीय अधिकारी शोभा जाधव, प्र. तहसीलदार घनश्याम जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डी. बी. जाधव, गणेश क्षीरसागर, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जे. जी. जाधव, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकीब उस्मानी, लातूर पाटबंधारे विभागाचे एस. एम. निटुरे, सुनंदा जगताप, गट विकास अधिकारी ए. बी. ताकभाते यावेळी उपस्थित होते.

हासोरी येथील नागरिकांसाठी तात्पुरता निवारा उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच जिल्हा परिषद शाळा खोल्यांसाठी तातडीने आराखडा तयार करून निधी मागणी प्रस्ताव सादर करावा. तात्पुरत्या वर्ग खोल्यां उभारण्यासाठी जागेचा शोध घ्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी दिल्या.

हासोरी येथील पाणी पुरवठा योजनेची नवीन टाकी उभारण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने त्वरीत पाहणी करून जागेचा शोध घ्यावा, असे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.

निवासी उपजिल्हाधिकारी श्री. ढगे यांनी हासोरी येथील उपाययोजना, प्रशिक्षण याविषयी माहिती दिली

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post