Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

गुन्हेगारीचा पर्दाफाश….! आईच्या छळास कार्नीभुत असलेल्या पित्याच्या खूनप्रकरणी दोघांना अटक : चिंचोली(ब) येथील घटना


गुन्हेगारीचा पर्दाफाश….!

आईच्या छळास कार्नीभुत असलेल्या पित्याच्या खूनप्रकरणी दोघांना अटक 
: चिंचोली(ब) येथील घटना



 लातूर: दारू पिऊन आईला सतत छळणाऱ्या बापाचा काटा काढणाऱ्या १९ वर्षीय मुलासह त्याच्या मित्राला गातेगाव पोलिसांनी अटक केली आहे. लातूर तालुक्यातील चिंचोळी (बल्लाळनाथ) येथील या घटनेने एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, या खुनाचा तीन दिवसांनंतर पोलिसांनी उलगडा करत घटनेचे अखेर बिंग फोडले. दरम्यान, लातूर येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोघांनाही ५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

चिंचोली (ब.) येथील नागनाथ खंडू काळे (वय ४९) हा सतत दारू पिऊन पत्नी आणि मुलाला सतत मारझोड करून छळत होता. दरम्यान, या सततच्या त्रासाला कंटाळून पत्नी अनेकदा माहेरी गेली होती.
रोजच्या भांडणाला, मारझोडीला त्रस्त झालेल्या मुलाने दोन महिन्यांपूर्वीच आपल्या जन्मदात्या बापाचा काटा काढण्याची मोहीम आखली होती.
याबाबत त्याने आपल्या एका मित्राशी चर्चा करून शांत डोक्याने कट रचला. आई आजोळी गेली होती. घरात कोणीच नाही, याचा फायदा घेण्याचे मुलाने ठरवले, नागनाथ काळे हा दारू पिऊन घरात 30 जुलै रोजी झोली गेला असता. मुलगा आकाश नागनाथ काळे (१९) याने मित्र रोहित रघुनाथ पोपळे (३१) याला सोबत घेत

वडील नागनाथ काळे याच्या गळ्यावर कोयत्याने सपासप वार करून ठार मारले. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, मुलगा आणि पत्नीने आपली तक्रार नाही, असे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, संशय आल्याने पोलिसांनी मुलाला ताब्यात घेत खाक्या दाखविला. आपणच बापाचा खून केल्याचे मुलगा आकाश याने पोलिसांकडे कबुली दिली. दरम्यान, मुलासह त्या मित्राला पोलिसांनी अटक करून गुन्ह्यात वापरलेला कोयता जप्त केला. दोघांनाही लातूरच्या न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर कांबळे यांनी दिली. तपास सहायक पोलीस निरीक्षक ए. बी. घाडगे करत आहेत.

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post