Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

मराठी साहित्यिक 'योगेश मोरे' यांनी घेतली यशस्वी भरारी

 


 


मराठी साहित्यिक 'योगेश मोरे' यांनी घेतली यशस्वी भरारी


औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील प्रसिद्ध मराठी साहित्यिक,गीतकार, संगीतकार कथा पटकथा लेखक योगेश तुळशीराम मोरे यांची केंद्रीय पत्रकार संघाच्या औरंगाबाद जिल्हा अध्यक्षपदी संदीप वि.कसालकर यांनी योगेश मोरे यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे.औरंगाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या विविध भागात मोरे हे निर्भिड,सडेतोड वार्तांकन करणारे, बहुआयामी पत्रकार म्हणून सुपरिचित आहेत.प्रिंट मिडियाबरोबरच अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक मिडिया यशस्वीपणे हाताळण्यास मोरे यांचा विशेष हातखंडा आहे.ग्रामपंचायत पासून विधिमंडळ,संसदेपर्यंत पत्रकारितेचा भरगच्च अनुभव त्यांनी अल्पावधीतच मिळवला आहे.अन्याय,अत्याचार,
भ्रष्टाचाराबरोबरच,शेती,उद्योग,विकास पत्रकारितेत त्यांनी मोलाचे योगदान दिलेले आहे.यातून त्यांचा अनुभव समृद्ध बनल्यामुळेच विविध सामाजिक,राजकीय संस्था, संघटनांमध्ये त्यांना सामावून घेतले आहे.पत्रकारांच्या प्रश्नावरही ते सजग राहून शासन दरबारी आवाज उठविण्याबरोबरच त्याचा पाठपुरावाही त्यांनी केला आहे.मोरे यांच्या पत्रकारिता, सामाजिक,राजकीय क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन केंद्रीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप वि.कसालकर यांच्या निर्देशानुसार तसेच केंद्रीय पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष,महाराष्ट्र प्रभारी कमलेश गायकवाड यांच्या संमतीनुसार त्यांची औरंगाबाद जिल्हाअध्यक्ष पदावर नियुक्ती केलेली आहे.त्यांच्या या नियुक्तीबद्दल
राज्याचे महसुलमंत्री ना.बाळासाहेब थोरात,मृद व जलसंधारण मंत्री ना.शंकरराव गडाख,राज्यमंत्री ना.तनपुरे,आमदार सुधीर तांबे,भाजपा आमदार प्रशांत बंब,महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले,जिल्हाअध्यक्ष रामेश्वर दरेकर आदींसह अनेकांनी योगेश मोरे यांचे अभिनंदन केले आहे.


Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post