Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

औसा तालुक्यातील किल्लारी गावच्या शेतजमीन नसलेल्या व्यक्तीच्या नावे झाला पीक विमा जमा

 


औसा तालुक्यातील किल्लारी गावच्या शेतजमीन  नसलेल्या व्यक्तीच्या नावे झाला पीक विमा जमा


अग्रीकल्चरल इन्शुरन्स कंपनीचा अदभूत चमत्कार
:-----------------------------------      
लातूर/-प्रतिनिधी 
-नावावर शेती असून  विमा भरून सुद्धा शेतकऱ्यांना पीकविमा वेळेवर मिळत नाही. पण नावावर  जमीन नसूनही  किल्लारी येथील नागरीकांच्या खात्यावर अग्रीकल्चरल इन्शुरन्स कंपनीने पिकविम्याची  रक्कम जमा केली आहे. विमा कंपनीच्या या अजब प्रकाराची किल्लारी परिसरात गजब चर्चा केली जात आहे.


किल्लारी येथील रहिवासी असलेले सतीश विश्वनाथ लोहार व त्यांच्या कुटुंबाच्या नावावर शेती नाही.त्यांचे लातुर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या किल्लारी येथील शाखेत १०३३११००२१०२५३२
या क्रमांकाचे खाते असून या बँक  खात्यावर एलआयसी अर्थात अग्रीकल्चरल कंपनीने दिनांक १७ मार्च २०२० रोजी दुपारी ४ वाजून १ मिनिटाला ३२२५ रुपये रक्कम  विम्यापोटी जमा झाली आहे. एवढेच नाही तर त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर त्या संबंधी मोबाईल वर संदेश पाठवण्यात आला आहे.विमा भरूनही अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना पीकविमा मिळत नाही.परंतु शेतजमीन नावावर नसतानाही विमा जमा कसं काय करण्यात आला ?याची चर्चा सुरू आहे.डिजिटल नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर करून गावपातळीवर तलाठी ,मंडळ अधिकारी, बँका यांच्यामार्फत तपासण्या छाननी करूनही असा गैरप्रकार विमा कंपन्या का करत असतील ? तर असे प्रकार किती जणांच्या बाबतीत घडतात याची  योग्य  चौकशी होणे गरजेचे आहे.
दरम्यान 'आपल्या नावे शेती नसतानाही कोणत्या आधारावर हा पीकविमा जमा करण्यात आला ? असा किती लोकांना वाटप करण्यात आला ? यातून 
किती लाभार्थी शेतकरी वंचित राहिले आहेत ? याची योग्य अशी चौकशी करण्यात यावी अशी तक्रार ,जिल्हाधिकारी आणि निवासी जिल्हाधिकारी यांच्याकडे केल्याचे सतीश विश्वनाथ लोहार यांनी आमच्या प्रतिनिधी  शी बोलताना सांगितले. बँक खात्यात पैसे जमा झाले  की ते तात्काळ उचलले जातात. परंतु, सतीश  लोहार यांनी प्रामाणिकपणाने त्यांच्या व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावे जमीन नसतानाही पीकविमा कोणत्या  आधारावर जमा केला,याचा जाब शासन आणि प्रशासनाला विचारला आहे. विमा कशा प्रकारे जमा झाला याचा शोध प्रशासन घेईल पण सतीश लोहार यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले पाहिजे


Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post