लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांचा मुंबई येथे शिवसेनेत प्रवेश...
मुंबई : (प्रतिनिधी) - आज २८ डिसेंबर २०२५ रोजी मुंबई येथे शिवसेना सचिव मा. संजय मोरे साहेब यांच्या हस्ते लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांचा शिवसेना प्रवेश झाला. शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा भगवा संजय मोरे यांनी व्यंकटराव पनाळे यांच्या गळ्यात घालून शिवसेनेतील प्रवेशाचे स्वागत केले.
तसेच लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंडितराव धुमाळ यांचाही आज शिवसेना सचिव मा. संजय मोरे यांच्या हस्ते शिवसेनेचा भगवा घालून शिवसेनेत प्रवेश संपन्न झाला.
यावेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख रवींद्र गुरमे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने, उदगीर चे माजी आमदार सुधाकरराव भालेराव, संतोष पनाळे, महेश चव्हाण, उल्हास सूर्यवंशी, शिवचरण पाटील, बाबुराव आंबेगावे, संजय बिराजदार, गहिनीनाथ राजे त्याचबरोबर अनेक मान्यवर व विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या सर्वांचेच शिवसेना सचिव संजय मोरे यांनी शिवसेनेचा भगवा घालून शिवसेनेत प्रवेश देऊन स्वागत केले.
Tags:
LATUR

