लातूर जिल्हा युवक काँग्रेसची आढावा बैठक उत्साहात संपन्न; शेकडो तरुणांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
आगामी राजकीय आव्हाने पेलण्यासाठी आणि काँग्रेसची विचारधारा तळागाळातील युवकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लातूर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित आढावा बैठक अत्यंत उत्साहात आणि सकारात्मक वातावरणात पार पडली. या बैठकीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे चाकूर तालुक्यातील शेकडो तरुणांनी निलेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
या बैठकीला भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व महाराष्ट्र सहप्रभारी श्री. नवजोत सिंग संधू, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. अभय दादा साळुंके, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस व मराठवाडा प्रभारी श्री. आमेर अब्दुल सलीम, प्रदेश प्रवक्ते ॲड. दीपक राठोड, माजी जिल्हाध्यक्ष प्रवीण बिरादार आणि प्रदेश सचिव श्री. गौरव जैस्वाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
संघटन मजबुतीवर भर
बैठकीत बोलताना मान्यवरांनी युवकांना मार्गदर्शन केले. युवक संघटन अधिक मजबूत करणे, आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहणे आणि केंद्र व राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणांविरुद्ध आक्रमकपणे लढा देणे, यावर सखोल चर्चा करण्यात आली. लातूर जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून, युवकांच्या ऊर्जेच्या जोरावर तो अधिक भक्कम केला जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
युवाशक्तीचा काँग्रेसमध्ये ओघ
या आढावा बैठकीचे औचित्य साधून चाकूर तालुक्यातील वैभव धोंडगे, नागनाथ सोनटक्के, प्रवीण साळुंखे, महेश साळुंखे, आहद मजकुरे, सरफराज चौधरी, विक्रम सिंह जुनी, संतोष जाधव, मनोज सोनवणे, रोहित धनेश्वर यांच्यासह अनेक तरुणांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. निलेश देशमुख यांनी सर्वांचे स्वागत करून आभार व्यक्त केले.
जिल्हाभरातील पदाधिकाऱ्यांची मांदियाळी
या बैठकीला चाकूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष पप्पू भाई शेख, उदगीर तालुका अध्यक्ष विवेक जाधव, शहर अध्यक्ष सोनू पिंप्रे, रेणापूर विधानसभा अध्यक्ष विश्वजीत पाटील, अहमदपूर तालुका अध्यक्ष अनिल शेळके, जळकोट तालुका अध्यक्ष धनराज दळवे, मदन बिराजदार (निलंगा), औसा विधानसभा अध्यक्ष संजय लोंढे, तालुका अध्यक्ष यश चव्हाण, शरद लुले (देवणी), माधव बेजरंगे यांच्यासह जिल्हाभरातील सर्व तालुक्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags:
LATUR



