विश्वात्मक शिक्षणाचे अर्ध्वयु प्रा. डॉ. विश्वनाथ कराड सर
शिक्षण पद्धती आणि विश्वशांती यांचे भारतीय प्रारूप निर्मिती करून ती यशस्वीपणे राबविणारे ज्ञानर्षी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड सर यांच्या स्वप्नपुर्तीचा सुवर्णक्षण म्हणजे यज्ञभूमी रामेश्वर येथील विश्वधर्मी मानवतातीर्थ भवनाचा भव्य उदघाटन सोहळा यांचा शिक्षक दिनानिमित्त परदेशी विद्यापीठांकडून व परदेशी संस्थान भव्य नागरी सत्कार होत आहे त्यानिमित्त त्यांच्या विश्व कार्याचा संक्षिप्त आढावा या ठिकाणी सादर करीत आहे.
|| शुभम ही कर्म विश्वनाथ: शुभत्व योपपद्यते ||
वैश्विक ध्येयाने प्रेरित होऊन आरंभ केलेले कार्य हे शुभकार्य असते आणि सर्व वैश्विक शक्तींचे पाठबळ लाभून ते यशस्वी होतेच ही उक्ती अत्यंत समर्पकतेने लागू पडते ते म्हणजे विश्वगुरू भारताच्या जडणघडणीमध्ये सक्रिय योगदान देणारे ज्ञानर्षी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड सर या नियतीने विशेष कार्य सोपविलेल्या सरस्वतीरत्न सुपुत्रास.
वसाहतवादी मानसिकतेतून केवळ उच्चशिक्षित भारतीय पिढी बनवून त्यातील स्वाभिमान व स्वत्व संपविणारी शिक्षण पद्धती बदलवून , भारतीय वैचारिक- सांस्कृतिक -अध्यात्मिक बैठक असणारी शिक्षण पद्धती निर्माण करून ती यशस्वीपणे अमलात आणत आधुनिकतेला संपन्न वैचारिक वारशाचे वारशाचे अधिष्ठान प्राप्त करून देणारे शिक्षण तज्ञ डॉक्टर वि.दा कराड सर यांना या सर्व कार्याच्या सन्मानार्थ अमेरिकेतील साल्ट लेक सिटी येथे आयोजित जागतिक शांतता परिषदेत गौरवान्वित करण्यात आले. भारताचे थोर सुपुत्र स्वामी विवेकानंद यांनी याच मालिकेतील परिषदेत पूर्वी भारतीय सभ्यता आणि संस्कृतीची जगाला पुनश्च ओळख करून दिली. या स्वामी विवेकानंद यांचा आदर्श समोर ठेवून त्या संकल्प मार्गावर मार्गक्रमण करणारे प्रा. कराड सर यांनी आधुनिकतेच्या अंधानुकरणामुळे संस्कृती व दिशा भरकटलेल्या पाश्चात्य समाजासमोर उच्च व आदर्श सांस्कृतिक मूल्य असणाऱ्या समरस भारतीय समाज व शिक्षण व्यवस्थेचे सामर्थ्य विदित करून भारताची मान अभिमानाने उंच केली. याच उतुंग कार्यासाठी अमेरिकेतील ब्रिगन यंग विद्यापीठाने त्यांना विशेष समारंभात मानद डॉक्टरेट प्रदान केली.
मेकॉले च्या पद्धतीतून शिकून मेकॅनिकल इंजिनियर होऊन सीओईपी सारख्या प्रतिष्ठित शासकीय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत राहिलेल्या प्राध्यापक कराड सर यांच्या अंतरीचा शिक्षक मात्र अस्वस्थ होत होता. शेतकरी कुटुंबातून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा बाज असलेल्या मनाला समाधान मात्र लाभत नव्हते. कृत्रिम शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षणाचा आत्मा कुठेतरी हरवल्याची खंत होती. यात बदल करण्याचा ध्यास आणि चाकोरी पद्धतीमुळे त्यात येणाऱ्या अडचणी एकीकडे तर अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या मर्यादित संख्येमुळे प्रवेश न मिळाल्यावर गुणवंतांची होणारी ससेहोलपट दुसऱ्या बाजूला होती.
"प्राप्तकाल हा विशाल भूधर | सुंदर लेणी तयात खोदा " हा ऊर्जामान संदेश अंगीकारत सुरू झाला एका ध्येयवेढ्या प्राध्यापकाच्या धडपडीच्या कहाणीचा पुढील अंक. काही सुहृद अत्यंत निरलसपणे सोबतीला आले आणि महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद झालेल्या उज्वल अध्यायाची सुरुवात झाली.
अभियांत्रिकी शिक्षण व गुणवत्तेचा मानदंड ठरलेल्या एमआयटी बरोबरच सह अभ्यासक्रम शाखा महाराष्ट्रभर सुरू झाल्या. शिक्षणाचे माहेरघर पुण्यातून उगम पावलेली ही ज्ञान - विज्ञान - अध्यात्म आधारित शिक्षणगंगा आज अनेक शिक्षण संस्थासह- एमआयटी विश्वशांती विद्यापीठ पुणे, एमआयटी एडीटी विद्यापीठ पुणे ,अवंतिका विद्यापीठ उज्जैन ,एमआयटी शिलॉंग विद्यापीठ आणि एमआयटी विश्व प्रयाग विद्यापीठ सोलापूर या पंच शैक्षणिक ज्ञानपीठ अर्थात स्वतंत्र विद्यापीठांद्वारे आधुनिक ज्ञान जनसामान्यांपर्यंत पोहोचवत आहे. "उदारचरितानाम तू , वसुधैव कुटुम्बकम" या उक्तीचे सार्थक करीत वैश्विक विद्यार्थी आज या शिक्षण संस्थांमध्ये येऊन , भारतीय अध्यात्मिक अधिष्ठान असणारे कालसुसंगत आधुनिक शिक्षण घेत आहेत तसेच अनेक माजी लाखो विद्यार्थी हजारो नामांकित उद्योग व्यवसायात देश प्रदेशात भारताचे नाव उज्वल करीत आहेत
वडील राष्ट्रधर्म पूजक वैकुंठवासी दादाराव कराड यांची जडणघडण: व मोठी बहीण त्याग मूर्ती वैकुंठ वासी प्रयाग अक्का कराड यांच्या मुशीतून तयार झालेले हे 'सरस्वती रत्न' अर्थात प्राध्यापक विश्वनाथ कराड सर होत. शिक्षण क्षेत्रातील अमुलाग्र बदलानंतर भारतीय ज्ञान -विज्ञान -अध्यात्म यांची थोरवी जाणलेल्या या दूरदर्शी व्यक्तित्वाने जगातील सर्वात उंच घुमट तोही संत ज्ञानेश्वर माऊलींच्या नावाने बांधण्याचा ध्यास घेतला. 'एकम सत विप्रा बहुदा वदंती ' यांचे आंतरिक ज्ञान असलेल्या प्रा. कराड सर यांनी संकल्पना- आराखडा -निर्मिती अशी त्रिमितीय भूमिका वठवत तरीही कर्त्याचे श्रेय स्वतः न घेता विश्वात्मक देवाला देत , तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर विश्वशांती घुमट व ग्रंथालय या अद्भुत ऐतिहासिक वास्तूचे निर्माण केले. हा विश्वातील सर्वात उंच विश्वशांती घुमट आहे व ही संपूर्ण भारत वासियांसाठी अभिमानाची बाब आहे. श्रीक्षेत्र आळंदीतील ऊर्जा केंद्र श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या सत प्रेरणेने सुरू झालेला भागवत धर्म सेवा संकल्प एका अत्युच्च घुमट रूपाने जगाला आपल्याकडे आकर्षित करीत आहे. आळंदीतील इंद्रायणी नदीवरील घाटाचे सुंदर बांधकाम , धार्मिक स्थळ ते ज्ञानस्थळ करणारे 84 फुटी कोलोजियम, संत तुकाराम महाराज यांची थोरवी दर्शविणारी 100 फूट उंच कमान आणि आषाढी कार्तिकी एकादशीला चालणारी सदभावी वारकरी सेवा , वाखरी येथील श्री समर्थ वारकरी महावीर कुस्ती स्पर्धा आणि अन्नदान याग ही काही प्रातिनिधिक उदाहरणे आहेत.
महर्षी वेदव्यास यांना आशीर्वच देऊन, श्री माता सरस्वती देवी जिथे प्रगट झाल्या त्या बद्रीनाथ जवळील माणा गावी सरस्वती नदीच्या तीरावर केवळ 63 दिवसात उभे केलेले नयनरम्य श्री सरस्वती धाम देवालय म्हणजे प्रा. डॉ. वि. दा. कराड सरांनी अनेक प्रतिकूलतेवर मात करीत, दृढनिश्चय आणि सत्य संकल्पाचा ध्यास पूर्ण करणारा वस्तुपाठच घालून दिलेला आहे .
अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचे सुचविलेले भव्य प्रारूप, नेपाळमधील भूकंपग्रस्तांसाठी टिकाऊ अशी बांधलेली संत ज्ञानेश्वर संत तुकाराम नगरातील 120 सुबक घरे, बिहार व देशातील अनेक ठिकाणी आलेल्या नैसर्गिक समस्यांमध्ये- आपत्तींमध्ये तत्पर मदतीचा हात , संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम या व्याख्यानमालेद्वारे ज्ञानप्रसाराचा अखंड चाललेला यज्ञ, विश्वराज बाग येथील श्री विश्वरूप दर्शन मंदिर तसेच सुप्रसिद्ध राजकपूर मेमोरियल , रामेश्वर रुई येथील राम रहीम सेतु अशी उत्तम कार्यशृंखलाच ज्यांनी स्वकर्तृत्वाने गुंफली ते भारतीय रत्न प्रा. डॉ. कराड सर सर्व विश्वासाठी एक प्रभावशाली दार्शनीकच आहेत.
प्रेरक : सूचकश्चेव वाचको दर्शकस्थता ।
शिक्षको बोधकश्चेव षडेते गुरव: स्मृत:।।
या सहाही रत्नांनी आभूषित असणाऱ्या कराड सरांना काशी विश्वनाथ धाम वाराणसी येथे अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवान्वित करण्यात आले. काशी विद्वत परिषदेतर्फे "विश्वशांती विद्यारत्न " बनारस हिंदू विद्यापीठातर्फे "विश्वशांती उद्गाता" तसेच "समर्पित जीवन गौरव पुरस्कार", संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठाचा "संस्कृत श्री" या सन्मानांनी सालंकृत प्रा. डॉ विश्वनाथ कराड सर यांचा कृतज्ञता सत्कार सोहळा राष्ट्रीय शिक्षक दिन मंगळवार दिनांक 5 सप्टेंबर 2023 रोजी त्यांचीच संकल्प सिद्धी असणाऱ्या विश्वातील सर्वात उंच विश्वशांती घुमट, विश्वराज बाग लोणी काळभोर, पुणे येथे संपन्न होत झाला. शैक्षणिक- सांस्कृतिक -अध्यात्मिक क्षेत्राची सखोल जाण ,उत्तुंग ध्येय आणि ध्येयपूर्तीचा ध्यास, संसाधनांची उपलब्धता, विद्वत्तेचे अधिष्ठान तत्त्वज्ञ संत ज्ञानेश्वर- संत तुकाराम तसेच स्वामी विवेकानंद यांची विचार साधना, वसाहतवादी मानसिकतेतून बाहेर पडून विश्वगुरू भारतासाठी अथक परिश्रम व सहयोग , देशाप्रती निष्ठा आणि समाजाप्रती आस्था या अष्टांग सदगुणांवर ज्यांचे जीवन कर्तृत्व दिमाखदारपणे त्याचबरोबर तितक्याच विनम्रतेने उभे आहे अशा प्रा डॉ वि. दा. कराड यांचा विशेष सन्मान पत्र देऊन परदेशी विद्यापीठांतर्फे खास करून अमेरिका, इंग्लंड, इंडोनेशिया येथील विद्यापीठांतर्फे त्यात ही प्रामुख्याने अमेरिकास्थित "ब्रिगम यंग युनिव्हर्सिटी ", 'उटा व्हॅली युनिव्हर्सिटी', 'वेस्टमिनस्टर युनिव्हर्सिटी' याबरोबरच विविध धर्माच्या खास करून बहाई- मुस्लिम -जैन -ख्रिस्ती - यहुदी - पारसी आणि हिंदू धर्मगुरूंच्या वतीने देण्यात आलेला सन्मान आशीर्वाद म्हणजेच एक हृदय कौटुंबिक सोहळाच होता. याच अद्भुत कार्य संकल्पनेतील पुढील भव्य वास्तुरचना म्हणजे यज्ञाभूमी रामेश्वर, लातूर येथे साकार होणारे २७० फूट लांब आणि १२७ फूट रुंदीचे भारतातील एकमेवाद्वितीय विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन | भारतीय संस्कृती, परंपरा यांचे वैश्विक दर्शन घडविणारे, सांस्कृतिक - अध्यात्मिक शिक्षणाचे केंद्र ठरणारे हे भवन म्हणजे भारताकडून संपूर्ण विश्वाला दिलेला अद्वैतातून एकात्मतेचा मानवीय संदेशच आहे. व्यक्तींच्या कल्याणार्थ विश्वधर्मी प्रा. डॉ. कराड सर यांनी आयोजिलेल्या महायज्ञात आपण सर्वानी आपल्या कार्यकर्तव्य पूर्तीच्या समीधा अर्पण करणे हे आपणा सर्वांचे सद्-भाग्यच | या विशात्मक संदेश देणाऱ्या कार्यास आपले शुभाशीर्वाद लाभावेत हि विनम्र भावना | या, आपण सर्वजण या वैश्विक कार्यात सहभागी होऊया आणि कृतज्ञेच्या ऋणातच आपले जीवन समृध्द करूया | वंदे भारत |.
या निमित्ताने त्यांच्या दृष्ट्या नेतृत्वास कृतज्ञतापूर्वक मानवंदना. येणाऱ्या काळात हिंदवी स्वराज्याची संकल्पना घेऊन विश्वगुरू भारत साकार होताना अशीच कीर्ती मानांकने स्थापित व्हावी यासाठी त्यांच्या दीर्घायु आरोग्यासाठी अभिष्टचिंतन आणि प्रार्थनीय.
|| तेजस्वीनावधीतमस्तू, मा विद्विषावहे ||
डॉ. रत्नदीप रा. जोशी
कुलसचिव,
माईर्स, एमआयटी शैक्षणिक संस्था
समूह, पूणे, भारत
Tags:
LATUR

.jpeg)
