अहमदपूर नगरपरिषद निवडणुकीकरिता* *निरीक्षकपदी ॲड. प्रमोद जाधव यांची नियुक्ती
लातूर/अहमदपूर प्रतिनिधी:-दि.१३ नोव्हेंबर २०२५(गुरुवार)
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक पार्श्वभूमीवर
काँग्रेस पक्षाने अहमदपूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ,राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख, राज्याचे माजी मंत्री आ.अमित विलासराव देशमुख, खा.डॉ.शिवाजी काळगे,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धीरज विलासराव देशमुख व प्रदेश उपाध्यक्ष तथा लातुर जिल्ह्याचे प्रभारी बाळासाहेब देशमुख यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी आपल्या अनुभवी नेत्यांवर संघटनात्मक जबाबदारी सोपवली आहे.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष आणि रेणापूर तालुका काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष ॲड.प्रमोद जाधव यांची अहमदपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
अहमदपूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करणे, उमेदवारांच्या निवड प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेणे,तसेच निवडणुक प्रचार यंत्रणे समवेत समन्वय साधणे ही प्रमुख जबाबदारी ॲड.प्रमोद जाधव यांच्यावर असेल.
ॲड. प्रमोद जाधव हे पक्षश्रेष्ठी आणि स्थानिक नेते यांच्यात दुवा म्हणून काम करतील आणि निवडणुकीच्या रणनीती आखणीत मार्गदर्शन करतील.ॲड.जाधव यांच्या व्यापक राजकीय अनुभवाचा आणि सहकारी क्षेत्रातील कामाच्या अनुभवाचा फायदा अहमदपूरमधील काँग्रेस पक्षाला नक्कीच होईल असा विश्वास जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी व्यक्त केला आहे.
*राजकीय आणि सहकारी क्षेत्रातील कार्य*
ॲड.प्रमोद जाधव हे लातूर जिल्ह्यातील एक अनुभवी आणि निष्ठावान काँग्रेस कार्यकर्ते असून ते सध्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (LDC Bank) उपाध्यक्ष म्हणून सद्या कार्यरत आहेत.
यापूर्वी त्यांनी रेणापूर तालुका काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष म्हणूनही प्रभावीपणे काम पाहिले आहे.
सहकारी आणि राजकीय क्षेत्रातील त्यांच्या कामामुळे त्यांची या भागातील जनसामान्यांमध्ये चांगलीच ओळख जनसंपर्क आहे.
ॲड. प्रमोद जाधव यांच्या नियुक्तीमुळे अहमदपूर नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाला एक अनुभवी आणि कुशल नेतृत्व मिळालेले असून त्यांच्या या नियुक्तीबद्दल त्यांचे जिल्हाभरातील काँग्रेस कार्यकर्ते आणि हितचिंतकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
-------------------------------------------
