शांतताप्रिय लातूरला हादरवणारी घटना!अहमदपूरमधील दुहेरी हत्याकांडाने लातूर हादरले
लातूर (अहमदपूर):
शांतता आणि भाईचारा यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या लातूर जिल्ह्याला पुन्हा एकदा एका धक्कादायक घटनेने हादरवले आहे. जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील रुद्धा गावात ३ नोव्हेंबरच्या रात्री बाप-लेकाची निघृण हत्या झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.
रुद्धा गावात शिवराज सुरनर (७०) आणि त्यांचा मुलगा विश्वनाथ शिवराज सुरनर हे शेतातील आखाड्यावर झोपले असताना त्यांच्यावर मध्यरात्री जीवघेणा हल्ला करण्यात आला.
हल्लेखोरांनी अतिशय क्रूरपणे दोघांच्याही चेहऱ्यावर, तोंडावर आणि गळ्यावर शस्त्राने वार केले. या क्रूर कृत्यानंतर आरोपींनी मृतदेह शेतातून उचलून ग्रामपंचायत कार्यालयाच्या पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीजवळ फेकून दिले. सकाळी ही घटना उघडकीस येताच शांतताप्रिय गावात खळबळ उडाली आहे. भाईचारा जपणाऱ्या या शहरात अशा प्रकारच्या घटना धडकी भरवणारे ठरत आहेत.
पोलीस प्रशासनाने तातडीने कठोर पाऊले उचलून गुन्हेगारांवर वचक बसवावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
Tags:
Ahmadpur
