Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

लातूर शहरातील जिवीतास धोका करणारे गुंगीकारक औषधे प्रिस्क्रीप्शनशिवाय विकणाऱ्या मेडीकलवर पोलीसांची कारवाई

लातूर शहरातील जिवीतास धोका करणारे गुंगीकारक औषधे प्रिस्क्रीप्शनशिवाय विकणाऱ्या मेडीकलवर पोलीसांची कारवाई

याबाबत अधिक माहिती अशी की, दि.०६/११/२०२५ रोजी श्री. समीरसिंह साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर शहर यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, जुन्या रेल्वे स्टेशनच्या मोकळया पार्कीगमध्ये एक इसम कारमध्ये बसुन काहीतरी नशा करीत असल्याची खात्रीशिर बातमी मिळाल्यावरून त्या ठिकाणी पोलीसांनी पंचासह जावुन छापा मारला असता एक इसम नशा करीत असता तेथे एक इसम नशा करताना मिळुन आला. त्यांची पंचासमक्ष झडती घेतली असता त्याचे ताब्यात नशेचे साहीत्य १) Tapentadol हे घटक असलेले Schedule H1 विनाप्रिस्क्रीप्शन विकण्यास बंदी असलेली गुंगीकारक १० गोळयांची स्ट्रीप, २) इंजेक्शन सिरींज, ३) एका कापडी पिशवीत वायग्रा गोळयांची स्ट्रीप, ४) एक प्रेसींग बॉल, ५) तीन लायटर, ६) नशा करण्याकरीता हाताला बांधण्याकरीता वापरला जाणारा एक काळा व एक लाल बेल्ट, ७) दोन काचेच्या चंबु आकाराच्या नळया (चिल्लम), ८) रक्ताचे डाग लागलेले कपडयाचे तुकडे, ९) Tapentadol हे घटक असलेले Schedule H1 विनाप्रिस्क्रीप्शन विकण्यास बंदी असलेली गुंगीकारक गोळयांची रिकामी स्ट्रीप, १०) एक स्टीलचा ग्लास, ११) एक इंजेक्शची न वापरलेली सुई इ. साहीत्य मिळुन आले. सदर इसमास गुंगीकारक औषधांचे प्रिस्क्रीप्शनवाबत विचारणा केली असता त्याने प्रिस्क्रीप्शन नसल्याचे सांगुन सदरचे गुंगीकारक औषध विना प्रिस्क्रीप्शन शिवाय गेले ०३ महीण्यापासुन गांधी चौकातील वारद मेडीकल मधुन खरेदी करत असल्याचे सांगीतले. त्यावरून पोह/महेश पारडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वारद मेडीकलचा मालक गांधी चौक, लातूर याचेविरूध्द पोस्टे गांधी चौक, लातूर येथे गुरनं. ५१६/२०२५ क.१२३ बीएनएस प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तसेच लातूर शहरात अवैधपणे गुंगीकारक औषधे प्रिस्क्रीप्शनशिवाय विक्री करणाऱ्या मेडीकलवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

सदरची कारवाई श्री. अमोल तांबे, पोलीस अधिक्षक, लातूर व श्री. मंगेश चव्हाण, अपर पोलीस अधिक्षक, लातूर यांचे मार्गदर्शनाखाली श्री. समीरसिंह साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर शहर यांनी व त्यांचे कार्यालयातील पोलीस अंमलदार महेश पारडे, अरविंद वाघमोडे, गणेश मोरे, राहुल क्षिरसागर, रविसन जाधव यांनी केली आहे.

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post