खोटा गुन्हा नोंद करणाऱ्या महावितरणच्याअधिकारी - कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची व जवाबदार पोलिसांवर कार्यवाही करण्याची श्रीकर फड यांची मागणी
लातूर : लातूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात आपल्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यास भाग पाडणाऱ्या महावितरणच्या मुख्य अभियंत्यासह जबाबदार पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक त्यांच्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी,अशी मागणी व्यावसायिक श्रीकर त्र्यंबकराव फड यांनी शनिवारी लातुरात पत्रकार परिषदेत बोलताना केली.
आपल्या स्वतःच्या कमर्शियल जागेतील कालबाह्य झालेली कमकुवत विद्युत लाईन स्थलांतरित करण्याकरिता आवश्यक असणारी सर्व प्रक्रिया पार पाडून, नियमाप्रमाणे पूर्ण रक्कम भरणा करूनही महावितरणचे संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहेत. तसेच या संदर्भातील दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी आपण न्यायालयात याचिका दाखल करून केली होती. आपल्या याचिकेप्रमाणे अंबाजोगाई न्यायालयाने दोषी अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. असे असतानाही कर्तव्यात कसूर करणाऱ्या महावितरणच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न महावितरणचेच अधिकारी , कर्मचारी करत असल्याचे निदर्शनास आले आहे, असे सांगून श्रीकर पुढे म्हणाले की, लातूर एमआयडीसी परिसरातील महावितरणच्या कार्यालयात मुख्य अभियंता अरविंद बुलबुले यांनी आपल्याला त्यांच्या कार्यालयात ते स्वतः हजर नसताना जावक क्रमांक नसलेला अहवाल घेऊन जाण्यास बोलावले होते. आपण त्यांची भेट घेऊन चर्चा करण्याच्या उद्देशाने कार्यालयातील त्यांच्या केबिनमध्ये बसलो असताना तेथून जबरदस्तीने पोलीस बळाचा वापर करुन आपल्याला एमआयडीसी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. . एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक यांनी आपल्याला एखाद्या सराईत गुन्हेगारांसारखी वागणूक दिली. आपल्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून कोठडीत बेकायदेशीरपणे डांबून ठेवल्याचा आरोपही श्रीकर फड यांनी यावेळी केला. तसेच या पत्रकार परिषदेत श्रीकर यांनी त्यांच्यावर पोलिस यांच्याकडून करण्यात आलेल्या मारहाणीचा, शिवीगाळीचा व्हिडिओही पत्रकारांना दाखविला .
पोलीस अधिकारी यांच्या सारख्या फिर्यादीलाच आरोपी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांमुळे संपूर्ण लातूर पोलीस दलाची प्रतिमाच मलीन होण्याची शक्यता निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी आपण मानवाधिकार आयोग, नांदेडचे पोलीस उपमहानिरीक्षक, लातूरचे पोलीस अधीक्षक, लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडेही रितसर तक्रार करून पोलीस निरीक्षक व महावितरणच्या संबंधित दोषी कर्मचाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी केल्याचे सांगितले. पोलीस दलात सामान्यांना मदत, सहकार्य करणारे अनेक पोलीस अधिकारी आहेत. मात्र, बोटांवर मोजण्याइतक्या प्रवृत्तीच्या अधिकाऱ्यांमुळे पोलीस दलाची प्रतिमा डागाळली जात असेल तर त्यावर वरिष्ठानी वेळीच उचित कार्यवाही करणे गरजेचे असल्याचे श्रीकर यांनी स्पष्ट केले. यावेळी अॅड. अनंत केंद्रे यांचीही उपस्थिती होती.
Tags:
Ahmadpur
AKOLA
AURANGABAD
BEED
Breaking
Ch.Sambhajinagar
Crime News
Crime Story
JALNA
LATUR
LEKH
Nanded
NASHIK
Nilanga
PARALI VAIJANATH
PUNE
SAMBHJI NAGAR
SANGLI
SATARA

