Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

आ. रमेशआप्पा कराड यांच्या उपस्थितीत रेणापूर नगराध्यक्षपदासाठी भाजपाकडून शोभा शामराव आकनगिरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

आ. रमेशआप्पा कराड यांच्या उपस्थितीत रेणापूर नगराध्यक्षपदासाठी भाजपाकडून शोभा शामराव आकनगिरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल






         लातूर दि.१५- रेणापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजपाच्या वतीने श्रीमती शोभा शामराव आकनगिरे यांचा उमेदवारी अर्ज १५ नोव्हेंबर शनिवार रोजी भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत दाखल करण्यात आला. यावेळी भाजपाचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने होते.

          येत्या २ डिसेंबर रोजी रेणापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी मतदान होणार असून भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या नेतृत्वाखाली रेणापूर शहरात कोट्यावधी रुपये खर्चाच्या केलेल्या विविध विकास कामाच्या आधारावर संपूर्ण ताकतीनीशी भारतीय जनता पार्टी निवडणूक रिंगणात उतरली आहे.

       या निवडणुकीत नगराध्यक्षपद महिलेकरिता आरक्षित असून या पदासाठी भाजपाच्या वतीने श्रीमती शोभा शामराव आकनगिरे यांनी भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या उपस्थितीत १५ नोव्हेंबर शनिवार रोजी दुपारी रेणापूर तहसील कार्यालय येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमकाका शिंदे, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत सोट, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ भोसले, जिल्हा चिटणीस दशरथ सरवदे, माजी सभापती अनिल भिसे, उपसभापती अनंत चव्हाण, मंडल अध्यक्ष महेंद्र गोडभरले, शरद दरेकर, रेणापूरचे पहिले नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे, शहराध्यक्ष अच्युत कातळे, किसान मोर्चाचे साहेबराव मुळे, महादेव साळुंखे, अँड. मनोज कराड, सरपंच सुनील चेवले, रवींद्र नागरगोजे, नामदेव बोंबडे, विष्णू गोरे, पद्माकर चिंचोलकर, रवींद्र पाटील, रामराव मोरे, विजय चव्हाण, श्रीकृष्ण मोटेगावकर, दत्ता सरवदे, चंद्रकांत कातळे, श्रीकृष्ण जाधव, संजय वीरुळे, दिलीप आकनगिरे, नारायण राठोड, महेश गाडे, मारूफ आतार, गणेश चव्हाण, राजकुमार आलापुरे, श्रीकृष्ण पवार, शेख शफी, दिलीप चव्हाण, गणेश माळेगावकर, शिवाजी जाधव, मच्छिंद्र चक्रे, अंकुश मोटेगावकर, लक्ष्मण खलंगरे, अंतराम चव्हाण, धम्मानंद घोडके, उत्तम चव्हाण, श्रीमंत नागरगोजे, ज्ञानेश्वर शिंदे, हनुमंत भालेराव, लखन आवळे, डॉ. मोहाळे, रफिक शिकलकर, सोपान सातपुते, राजकुमार आकनगिरे, नरसिंग येलगटे, इस्माईल बावचकर, संतोष राठोड, योगेश राठोड, शरद चक्रे, रमा चव्हाण, मनोज चक्रे, फारूक कुरेशी, शेख अजीम, जगन्नाथ कातळे, अंकित हाके, सलीम शेख, अवेज कुरेशी, लक्ष्मण दळवी, सोमनाथ व्यवहारे, रोहन पांचाळ, आर्षद तांबोळी, सोनू उरगुंडे, हुसेन पठाण, महेश वरवटे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post