रमेशआप्पा जनतेचे आमदार ! कामगिरी दमदार !!
रेणापूर शहराच्या विकासासाठी आणखी ८ कोटीचा निधी मंजूर
लातूर दि. ३० - ग्रामीणचे आमदार श्री. रमेशआप्पा कराड यांच्या प्रयत्नातून रेणापूर शहरातील विविध विकास कामासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तब्बल ८ कोटी २१ लक्ष रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. गेल्या पंधरवाड्यातच १० कोटी रुपयाचा निधी प्राप्त झाला असून आ. कराड यांच्यामुळेच रेणापूर शहराच्या चौफेर सर्वांगीण विकासाला गती मिळत असल्याने रेणापूर येथील नागरिकांनी मोठे समाधान व्यक्त केले आहे.
भारतीय जनता पार्टीचे नेते श्री. रमेशआप्पा कराड हे खऱ्या अर्थाने लातूर ग्रामीण मतदार संघातील जनतेचे आमदार असून त्यांनी मतदार संघातील गावागावात वाडी वस्तीत मोठ्या प्रमाणात निधी आणून कामगिरी दमदार असल्याचे कृतीतून दाखवून दिले आहे. रेणापूर नगरपंचायत भाजपाच्या ताब्यात आल्यापासून राज्यातील महायुती शासनाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये खर्चाच्या इंनडोर क्रीडा संकुल, प्रशासकीय इमारत, पाणीपुरवठा योजना, श्री रेणुका देवी मंदिर भक्तनिवास, बालाजी मंदिर परिसरात भव्य सभागृह, रेणा नदीवर घाट बांधकाम, अशोक सम्राट बौद्ध विहार, मुस्लिम बांधवांसाठी शादीखाना, विविध समाजांची समाज मंदिरे, अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्ते, नाली बांधकाम, अंगणवाडी बांधकाम, पथदिवे, वाचनालय विकसित करणे यासह विविध कामासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी आ. रमेशआप्पा कराड यांनी मंजूर करून आणला. रेणापूर शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाला असून यामुळे रेणानगरीच्या विकासाला गती मिळाली आहे.
विविध मंजूर झालेल्या कामापैकी काही कामे पूर्ण झाली आहेत काही कामे प्रगतीपथावर आहेत तर काही कामे येत्या काळात सुरू होणार असून शहरातील उर्वरित इतरही कामांना मान्यता मिळावी यासाठी भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि जिल्ह्याचे पालकमंत्री मा. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. केलेल्या पाठपुराव्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगर उत्सव महाअभियान योजनेतून ३ कोटी ३९ लक्ष ६९ हजार, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्ती सुधार योजनेतून १ कोटी ४७ लक्ष २७ हजार, नागरी दलितेत्तर वस्ती सुधार योजनेतून ३ कोटी ३५ लक्ष ५५ हजार असे एकूण ८ कोटी २१ लक्ष रुपयाचा निधी मंजूर झाला आहे.
सदरील मंजूर निधीतून विविध प्रभागात सिमेंट रस्ते, नाली बांधकामासह नाला बांधकाम, दलित वस्ती स्मशानभूमी बांधकाम, नरसिंह मंदिर सभागृह बांधकाम, नरहरी मंदिर सभागृह बांधकाम, महादेव मंदिर सभागृह बांधकाम, नरसिंह मंदिर बांधकाम असे एकूण २१ कामांना मान्यता मिळाली आहे. रेणापुर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर करून दिल्याबद्दल भाजपाचे नेते आमदार श्री. रमेशआप्पा कराड यांचे प्रथम नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे, माजी नगराध्यक्षा आरती राठोड, भाजपाचे चंद्रकांत कातळे, सुधीर तोडकरी, श्रीकृष्ण मोटेगावकर, दत्ता सरवदे, अच्युत कातळे, दिनकर राठोड, विजय चव्हाण, गणेश चव्हाण, शेख अजीम, दिलीप आकनगिरे, उत्तम चव्हाण, राजकुमार आलापुरे, उज्वल कांबळे, महेश गाडे, अंतराम चव्हाण, मारूफ आत्तार, उत्तम घोडके, रमा चव्हाण, लखन आवळे, धम्मानंद घोडके, संतोष राठोड, अंकुश मोटेगावकर, दिलीप चव्हाण, सोपान सातपुते, संजय वीरुळे, हनुमंत भालेराव, अमृतेश्वर स्वामी, नंदकुमार ब़डे, शेख सलीम, शेख मकसूद, गणेश माळेगावकर, रफिक शिकलकर, शरद चक्रे, हरी पांचाळ, मनोज चक्रे, सुभाष राठोड, सचिन शिरसकर, टिकू दळवी, शिवाजी भावे, विकी राजे, आवेश कुरेशी, गणेश भोकरे, रोहित खुमसे, पप्पू कुडके यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते लोकप्रतिनिधी पदाधिकारी यांनी आभार व्यक्त केले आहेत.
Tags:
LATUR
.jpeg)