Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा अनावरण सोहळा!

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा अनावरण सोहळा!






उदगीर-माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांच्या माध्यमातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा व स्मारक या कामाचा लोकार्पण सोहळा तसेच विकासकामांचे भूमिपूजन आयोजित करण्यात आले होते. यावेळी उपस्थित राहून पुतळ्याचे अनावरण करत उपस्थित जनतेशी संवाद साधला. 

प्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष भदंत उपगुप्त महाथेरो, लातूर भिक्खू संघ भिक्खू दयानंद थेरो, राष्ट्रीय अध्यक्ष पीपल्स रिपाई जोगेंद्रजी कवाडे साहेब, आयोजक आमदार संजय बनसोडे, श्रीमती शिल्पाताई संजय बनसोडे, गायक आदर्श शिंदे, पालकमंत्री गोंदिया इंद्रनील नाईक, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार अमोल मिटकरी, माजी आमदार गोविंदराव अण्णा केंद्रे, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे सावकार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल भैया केंद्रे, प्रदेश सरचिटणीस व्यंकटराव बेंद्रे, अफसर बाबा शेख, निवृत्तीराव कांबळे, बाळासाहेब सोळसकर, ब्रम्हाजी केंद्रे, रामचंद्र तिरुके, अनिल ठिकळे, सुदर्शन मुंडे, राहुल अंबसंगे, उदय सिंग ठाकूर, रामदास बेंबडे, मनमत आप्पा किडे, बबनराव भोसले, बालाजीराव भोसले, प्रशांत पाटील, धनाजी मुळे पाटील, शफीभाई हाश्मी, विठ्ठलराव चव्हाण, प्रमोद केंद्रे, प्रभावती ताई कांबळे, सय्यद जानीमिया, बाळासाहेब पाटोदे, संग्राम पाटील हासुळे, उदयसिंग मुंडकर, गजानन दळवे, चंद्रकांत टेंगटोल उपासक, उपासिका, पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उदगीरची पवित्र अशी भूमी. जिथे खऱ्या अर्थाने समतेचा वारसा आणि वसा जोपासला जातो. आपण सर्वजण खऱ्या अर्थाने भाग्यवान आहोत की या ठिकाणी आपण सर्वजण वास्तव्यास आहात. आपण केवळ एक पुतळा उभारत नाही आहोत एका विचाराची मूर्त रूपात प्रतिष्ठा करत आहोत. हा पुतळा संघर्षाचा प्रतीक, स्वाभिमानाचा आवाज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा जिवंत साक्षीदार. डॉ. बाबासाहेबांनी अंधारलेल्या समाजाला शिक्षणाचा दिवा दिला, असमानतेतून समतेचा मार्ग दाखवला, आणि अन्यायातून न्यायाच्या लढ्याची ज्योत पेटवली.

आज त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण करताना, आपण त्या प्रत्येक संघर्षाला नतमस्तक होत आहोत. ही स्मारकभूमी येणाऱ्या पिढ्यांना सांगेल की विचार कधी मरत नाहीत, संघर्ष व्यर्थ जात नाही, आणि सत्य, समता, बंधुता या मूल्यांवर उभा समाज नेहमीच अमर राहतो. तसेच विश्वशांती बुध्दविहार येथे शिल्पाकृती व गार्डन विकसित करणे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर किडो वंडरलॅण्ड आणि पार्क विकसीत करणे या कामाचे भूमिपूजन होत आहे. या विकास कामांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला सेवा उपलब्ध होतील. त्याचबरोबर रस्त्यांच्या कामामुळे विकासाचा नवा अध्याय दिला जाणार आहे. 

उदगीर विधानसभा मतदारसंघात सहकार चळवळ निश्चितपणाने सक्षम करण्यावर आपण भर देणार आहोत. मराठवाड्याचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने आपण प्रयत्नशील आहोत. जिल्हा बँक, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी, पतसंस्था यांच्या असणारे प्रलंबित प्रश्न तुम्ही हक्काने माझ्याकडे घेऊन या मी त्या निश्चितपणाने मार्गी लावील. उदगीर मतदारसंघात सहकाराची चळवळ माजी मंत्री बाळासाहेब जाधव साहेब यांनी सुरू केली होती. सहकारी चळवळ रुजवण्याचे काम आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी झालेल आहे. उदगीर तालुका हा शेतकऱ्यांचा पशुपालकांचा तालुका आहे. सर्वात मोठी जनावरांची बाजारपेठ या ठिकाणी असून शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळत असते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या सर्व शेतकरी बांधवांच्या जीवनात नवी क्रांती घडवण्याचं काम यापुढील काळात आपण सर्वांनी करायला पाहिजे.

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post