पायी पेट्रोलींग दरम्यान गांधी चौक पोलीसांची मोठ्या आवाजात गाणी वाजवणाऱ्या ऑटो चालकांवर कारवाई
याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे आदेशान्वे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात आदेशान्वये गांधी चौक पोलीसांमार्फत सध्या जिल्हयासह लातूर शहरात दिपावली सणानिमीत्त गंजगोलाई, सराफ लाईन, कापड लाईन, भुसार लाईन, भांडी गल्ली, मज्जीद रोड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरीकांची गर्दी होत असल्याने दररोज पायी पेट्रोलींग चालु आहे. आज दि.१६.१०.२०२५ रोजी गांधी चौक पोलीसांचे पथक पेट्रोलींग करीत असतांना गंजगोलाई परिसरात ऑटोरिक्षा चालक मोठ्या आवाजात गाणी वाजवत असल्याचे निदर्शनास आल्याने अशा ऑटो चालकांवर पायी पेट्रोलींग दरम्यान मोहीम राबवुन त्यांचे ऑटोमधील साऊंड बॉक्स काढून जप्त करुन त्यांचेवर कायदेशीर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली आहे.
सदरची मोहीम उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसींह साळवे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे गांधी चौक येथील पोलीस निरीक्षक श्री सुनिल रंजितवाड, पोउपनि श्री सोनकांबळे, पोलीस अंमलदार नागनाथ नराळे, संतोष गिरी, कृष्णा शेळके, राहुल दरोडे, दंगा नियंत्रण पथकातील अंमलदार यांनी केली आहे.
Tags:
LATUR
