Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

सोलापूर येथिल माहिती अधिकार कार्यकर्ता अनमोल केवटे हत्या प्रकरणी एकास अटक तिन जन फरार

सोलापूर येथिल माहिती अधिकार कार्यकर्ता अनमोल केवटे हत्या प्रकरणी एकास अटक तिन जन फरार


कारला जीप गाडीचा कट लागल्याच्या कारणाने झालेल्या वादावादीत सोलापुरातील भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा माजी कार्यकर्ता व माहिती अधिकार कार्यकर्ता अनमोल अनिल केवटे (वय 34, रा. मंद्रूप, द. सोलापूर) याचा धारदार हत्याराने भोसकून खून करण्यात आला. तसंच त्याच्यासोबत असेलली महिला पदाधिकारी सोनाली भोसले-सुपेकर (वय 32 रा. अंत्रोळी, ता. दक्षिण सोलापूर) या गंभीर जखमी झाल्या आहेत. या भयंकर घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली.
भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या लेटर पॅडवर त्याने शिक्षण संस्था, शिक्षक, शासकीय कर्मचारी, पोलिस यांच्याविरोधात शेकडो तक्रारी दिल्या होत्या. या तक्रारींचा तो पाठपुरावाही करत असायचा. केवटे यांच्या वर्तनामुळे अनेक शासकीय कर्मचाऱ्यांच्या मनात धडकी भरली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, अनमोल केवटेचा खून बुधवारी मध्यरात्रीनंतर 12.45 वाजता खाडगाव रोड, लातूर येथे झाला. मृत अनमोल केवटे आणि सोनाली भोसले हे दोघे बुधवारी अ.भा. भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या लातूर येथील बैठकीसाठी गेले होते. सोनाली भोसले यांच्यासोबत अनमोल यांचं बोलणं झालं आणि सोनाली यांना संघटनेचे पद देण्याबाबत त्यांची पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली. पद देण्यास त्यांनी नकार दिल्यानंतर जेवण करून ते रात्री सोलापूरच्या दिशेने निघाले होते. गाडीला कट लागल्याच्या कारणावरून क्रूझर चालकात आणि अनमोल केवटे या दोघांत वादविवाद झाला होता. यावरून क्रूझर चालकाने अनमोल केवटेचा गळा चिरला आणि सोनाली भोसलेला पाठीत पोटात भोकसले. सोनाली भोसले यांच्यावर आता लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

*पोलीस ठाणे शिवाजीनगर हद्दीमध्ये घडलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात.*

           याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक 17 ते 18 सप्टेंबर रोजीचे मध्यरात्री 12.45 वाजण्याचे सुमारास पाच नंबर चौक ते औसाकडे जाणारे बायपास रोडने लहुजी साळवे चौक, लातुर येथे गाडीला कट मारण्याच्या कारणावरून क्रुझर गाडीमधून आलेल्या चौघांनी ईरटीका गाडी मधील प्रवाशांसोबत भांडण तक्रारी करून त्यांना शिवीगाळ करुन लाथा बुक्याने मारहाण केली त्यातील एकाने हातातील चाकुने ईरटीका गाडी मधील अनमोल केवटे याचेवर वार करुन खुन केला व सहप्रवासी सोनाली भोसले यास जीवे मारण्याचे उद्देशाने चाकूने भोसकून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. त्यावरून पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे गुन्हा क्रमांक 367/25 कलम 103(1), 109(1), 126(2),352,3(5) BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
               नमूद गुन्ह्याच्या घटनास्थळास तात्काळ वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी भेट देऊन तपासाबाबत सुचना केल्या त्यानुसार तपासाकरिता पथक नेमण्याबाबत आदेशीत केले. सदरचे आरोपी गुन्हा केल्यानंतर फरार झाले आहेत. पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांनी गुन्ह्यातील फरार आरोपींचा तात्काळ शोध घेण्याचे निर्देशित केले होते. नमूद गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न झाले आहेत.
              त्या अनुषंगाने श्री. मंगेश चव्हाण अपर पोलीस अधीक्षक लातूर, श्री. समीरसिंह साळवे उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, पोलीस ठाणे शिवाजीनगर चे पोलीस निरीक्षक दिलीप सागर, पोलीस ठाणे रेणापूरचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे दोन तर पोलीस ठाणे शिवाजीनगर व रेनापुर यांचे प्रत्येकी एक पथक असे एकूण चार पथके तयार करून गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यात येत आहे दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीवरून गुन्ह्यातील आरोपी त्यापैकी एक आरोपी

1) शुभम जयपाल पतंगे, वय 24 वर्ष राहणार संजय नगर, बस स्थानक समोर, रेनापुर.

 यास त्याचे राहते ठिकाणाहून चौकशी कामी ताब्यात घेण्यात आले असून गुन्ह्यात वापरलेली क्रुझर गाडी क्रमांक एम. एच.26 व्ही 2356 चा शोध घेऊन ती जप्त करण्यात आली आहे.
                 गुन्ह्यातील उर्वरित 03 आरोपींचा शोध सुरू असून लवकरात लवकर त्यांना नमूद गुन्ह्यात अटक करण्यात येईल. गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे शिवाजीनगर चे सहाय्यक पोलीस निरीक्षक जिरगे हे करीत आहेत.

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post