एक वली अवलीया माझे- मा.शिवाजीराव पाटील कव्हेकर साहेब
काही नावाच्या नुसत्या उच्चाराने चैतन्य प्रकट होते. अभिमान जागृत होतो, मन प्रसन्न होते आणि आपण आदराने नतमस्तक होतो. असेच नाव ज्यांच्यासमोर माझे कर (हात) नेहमी आदराने नमन करतात. ते माझ्यासाठी एक वली अवलीया मा.शिवाजीराव पाटील कव्हेकर साहेब होय.
मी सरदार, शेख सरदार जातीने-धर्माने मुसलमान मी, आज शिक्षक आहे. मा.कव्हेकर साहेबांच्या जे.एस.पी.एम.संस्थेत.
“ला ईलहा ईलल्लाह” हे माझ्या धर्माचे पहिले वाक्य. याचा अर्थ अल्लाशिवाय कोणीही ईश्वर नाही. होय मी ही हेच मानतो की, अल्लाशिवाय, ईश्वराशिवाय कोणीही मोठा नाही. परंतु, अल्ला, ईश्वर ज्यांच्यावर प्रेम करतो, अशा त्यांच्या नेक बंद्यासाठी (भक्तासाठी) त्यांची मदत करण्यासाठी जीवन सुखमय करण्यासाठी, जीवनाचा खरा मार्ग दाखविण्यासाठी त्यांच्यामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी देवलोकातून फरिश्ते पाठवित असतो, वली पाठवित असतो, अवलिया पाठवित असतो, असे मी वाचत आलो आहे, ऐकत आलो आहे.
कदाचित मी अल्लाचा प्रिय भक्त असेन म्हणून या भूलोकात अल्लाने माझी मदत करण्यासाठी एक अवलिया पाठविला असेल आणि तो अवलिया दुसरे कोणी नसून मा.शिवाजीराव पाटील कव्हेकर साहेबच असतील याचा अभास मला होत चाललेला आहे. माझ्या जीवनातील काही घटनेवर थोडासा प्रकाश टाकून गेलो की याची खात्री पण होत जाते.
साहेबांच्या विचारधारेची प्रचिती मला तेंव्हा आली, जेंव्हा मी शाळेत रूजू झालो. मी एका सर्वसाधारण कुटुंबातील मुलगा, वशीला नाही, राजकीय वरदहस्त नाही, पैसा नाही, कौटुंबिक मोठेपणा नाही, अस्तित्त्व शुन्य मी. कुटुंबाची तर बदनामीच सर्वत्र, गुंड, चोर, बदमाश हे अलंकार माझ्या कुटुंबाला लोकांनी दिलेले. समाजातील इतर जातीय धार्मिक लोकतर सोडाच पण माझ्याच जाती-धर्माचे लोक आम्हाला तिरस्कारानेच पाहत असत. कोणी कोणतेही निमंत्रण देत नसत, चर्चा करत नसत, मान तर सोडाच पण कोणी डुंकूनही पाहत नसे. परंतु मला नोकरी देताना मा.साहेबांनी माझ्या घराचा, कौटुंबिक परिस्थिचा विचार केला नाही. त्यांच्या जातीचा ना धर्माचा नसताना त्यांनी मला नोकरी बहाल केली. आणि सुरू झाला माझा उत्कर्ष. साहेबांनी मला पदरात घेतले, अशाप्रकारे एका जरजर घरातील व्यक्तिस आकार देण्यास सुरूवात झाली, त्यांच्याकडे असलेल्या पारखी नजरेने साहेब म्हणत- “सरदार मी जात-पात-धर्म पाहत नाही, जो काम करील, तोच माझा पाहुणा, सोयरा असेल. तू ईमानदारीने काम कर.”
हे साहेबांचे वाक्य एखादा नादब्रम्ह कानात ऐकू यावा तसे हे शब्द सतत ऐकू येत असत. आणि हेच वाक्य माझ्या हृदयात बसले ते कायमचेच! साहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे एक-एक पैलू उलगडू लागले. मला साहेबांच्या वाक्यावरून क्षणभर का होईना माझे मन इतिहासात गेले. आणि मी जे.एस.पी.एम.चा मावळा बनलो.
साहेबांनी हळू-हळू माझ्यावर वेगवेगळ्या जबाबदार्या देण्यास सुरुवात केली. संस्थेमधील मोठ-मोठी पदे साहेबांनी मला दिली. जशी-जशी जबाबदारी वाढत गेली तस-तसे मला जाणवले की, आदर्श व्यक्ती कसा असतो- याचे साहेब चालते बोलते विद्यापीठच आहेत.
साहेबांच्या व्यक्तिमत्त्वावर सर्वांना सोबत घेऊन चला ही छत्रपती शिवाजी राजेंच्या कृतीची छाप पडली आहे. फुले, शाहु, आंबेडकर यांच्या “बहूजन हिताय” या विचारांचा पगडाच जनू यांच्यावर अध्यात्मिकतेवर जोर नाविण्याचे भोक्ते, तळागाळातील लोकांसाठी काम, निष्ठावंतांची ढाल, दुसर्या बलस्थानाला संधी देत असताना जात,धर्म, पंथ यांचा विचार न करणारे भाग्यविधाते, जागरूक जणनेते, बाहेरून कठिण पण अंतरमनात गोडवा असणारे पितृतुल्य व्यक्तिमत्त्व म्हणजे मा.कव्हेकर साहेब. अंतकरण अत्यंत साफ, कपट,मळ, द्वेश याचा लवलेश सुध्दा नाही. जे चुकले ते तोंडावर बोलणारे स्पष्ट वक्ते, शंभू महादेवासारखे सारखे भोळे माझे साहेब.
माझ्यासाठी किती करावे साहेबांनी? काय काम द्यावे, हा विचार करूनच डोळ्यात आसवे आल्याशिवाय राहत नाहीत. एक प्रसंग सांगावासा वाटतो. कव्हा गावाचे एक मुस्लीम प्रतिष्ठित व्यक्ती साहेबांना भेटण्यासाठी आले. योगयोगाने मी तेथे होतो. साहेबांनी त्यांना विचारले याला ओळखता का? हा माझा सरदार, एम.आय.डी.सी.येथील जेएसपीएमचा कॅम्पसचा प्रमुख आहे. हाच आम्हाला सांगतो- काय काम करायचे ते. तो व्यक्ती एकदा साहेबांकडे व एकदा माझ्याकडे बघतच राहिले. ते हेच व्यक्ती होते. ज्यांनी कधीही मला त्यांच्या घरी येवू दिले नव्हते. माझे मन डोळ्यातून ज्यांना सांगत होते. पहा माझे साहेब, ज्यांनी मला मान उंच करून जगण्याची संधी दिली. प्रतिष्ठा दिली. राजकीय मंडळी मोठ-मोठे नेते यांना भेटण्याची संधी दिली. शासकीय अधिकारी यांना बोलण्याची संधी दिली. तसेच मला माझे व्यक्तिमत्त्व घडविण्याची, स्वतःला सुधारण्याची, जगण्याची संधी दिली.
साहेबांनी माझ्यावर अफाट प्रेम केलं. कधी-कधी आमचे सहकारी आपापसात बोलत असताना मी ऐकायचो माझ्याबद्दल ते म्हणत- ीरीवरी ळी रप रिश्रिश ेष ीरहशलफी शूशी (सरदार ईज अॅन अॅपल ऑफ साहेब्ज आईज) कधी कधी कांही लोक साहेबांना चाड्या सांगत असत पण साहेब त्यांचे ऐकत नसत.
ीशशळपस ळी लशश्रर्ळींळपस (सिईंग ईज बिलिव्हिंग) यावर साहेबांचा खुप विश्वास आहे.
माझ्या सुखात आणि दुःखात नेहमी साहेबांचा हात आणि आशीर्वाद माझ्या पाठीवर राहिलेला आहे. दुःखामध्ये साहेब मला भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, असे सांगून नेहमीच उभे असत. गेल्यावर्षी अनपेक्षित संकट माझ्यावर आले. मी आजारी पडलो. डॉक्टरांनी अॅजोप्लास्ट करण्याचा सल्ला दिला. पुणे येथे रूबी क्लिनिक हॉल येथे मी अॅटमीट झालो. पत्नी, भाऊ सोबत होते. मनात विचारांचे थैमान चालू होते. तेवढ्यात मोबाईलची बेल वाजली. मी फोन उचलला. साहेबांनी विचारले कोठे आहेत सरदार? कंठ दाटून आला शब्द बाहेर पडत नव्हते. पत्नीने फोन घेतला व काय झाले ते सांगितले.
सकाळी 10 वाजता साहेब पुण्यात मला एका शिक्षकाला मी साधा नोकर असून सुध्दा मला भेटण्यासाठी लातूरहून पुण्यात येत आहेत हे समजले. ऑपरेशन करण्यास अवधी होता. मन साहेबांच्या विचारात होते. आठवणींच्या गतकाळात गिरक्या मारत होते. साहेबांचे उपकार, त्यांचे शब्द, त्यांचा आधार, त्याच्या कामाची पध्दत त्यांचा सहवास या सर्व गोष्टी मनाला विचलीत करत होत्या. आता सर्व संपले असे वाटत होते. यातच झोप लागली. पत्नीच्या आवाजाने उठलो तर समोर साहेब उभे होते.
नवचैतन्य घेऊन नवजीवन घेऊन माझे साहेब आले अन् त्यांनी मला विचारले-अरे सरदार असे कसे झाले? घाबरू नकोस. पैसे लागत असतील तर देवू का? तुला काही होणार नाही, काही होऊ देणार नाही आम्ही. बस्स हे वाक्य ऐकून मनातील भीती गेली. असे वाटले की, कोणीतरी देवदूत बोलतोय, मला माझा पांडूरंग बोलतोय, मला माझे वली बोलताहेत. माझे अवलिया बोलताहेत आणि मला मुस्लीम हादिसची ओळ आठवली तुमचे उत्तम शासक ते आहेत, त्यांच्यावर आपण प्रेम करतो व ते आपल्यावर प्रेम करतात. साहेब आपणांस दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब
शेवटी साहेबांबद्दल एवढेच म्हणावेसे वाटते
तुझे पाय माझी काशी॥ कोण जाय माझे काशी॥
तुझे रूप तेची ध्यान ॥तेची माझे अनुष्ठान ॥
तुझे चरण तेची गया ॥ जाले गया वजन देहा ॥
तुका म्हणे एकच तिर्थ ॥ तुझ्या पायी वसती येथे ॥
- सरदार शेख सर
महाराष्ट्र विद्यालय,लातूर
मो.9665599400
Tags:
LATUR



