Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

लोकमान्य टिळक विचार मंचच्या वतीने लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी

लोकमान्य टिळक विचार मंचच्या वतीने लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी 



लातूर/प्रतिनिधी : लोकमान्य टिळक विचार मंचच्या वतीने लोकमान्य टिळक यांची १६८ वी जयंती साजरी करण्यात आली.
    जयंतीनिमित्त शहरातील टिळक चौक येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लातूर शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष ॲड.
किरण जाधव,भाजपाचे माजी शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे,राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष राजा मणियार,माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे,विवेकानंद रुग्णालयातील ऱ्हदयरोग तज्ञ डॉ.संतोष देशपांडे,
माजी नगरसेविका सौ.वर्षा कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
    यावेळी बोलताना डॉ.देशपांडे यांनी लोकमान्य टिळक यांचे स्वातंत्र्यसंग्रामात खूप मोठे योगदान असल्याचे सांगितले.टिळकांचे विचार आजही प्रेरणादायी असल्याचे ते म्हणाले.
   प्रास्ताविकात टिळक विचारमंचचे अध्यक्ष संजय निलेगांवकर यांनी लातूर शहरात लोकमान्य टिळक यांचे काही काळ वास्तव्य असल्याचे सांगितले. त्यांच्याच पुढाकारातून लातूर येथे जिनिंग सुरू झाली.लातुरातील सार्वजनिक गणेशोत्सव टिळकांनी सुरू केलेला असल्याचे ते म्हणाले. लातूर शहरातील टिळक चौकात टिळकांचा भव्य पुतळा लवकरच उभा केला जाणार असल्याचेही निलेगांवकर यांनी सांगितले.
   कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मंचचे सचिव जयंत शास्त्री तर आभार प्रदर्शन संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब देशपांडे यांनी केले.या कार्यक्रमास शेषराव कुलकर्णी,वीरेंद्र पाटील,ॲड.नरेंद्र पाटील,गणेश महापुरकर,धनंजय बोरगावकर,किरण कुलकर्णी,सचिन दिवाण,दीपक कोटलवार,संजय सूर्यवंशी,शिवाप्पा कोरडे,दगडुअप्पा मिटकरी,ॲड,कृष्णा मुगळीकर,प्रसाद उदगीरकर,माधव कुलकर्णी,नामदेव पाटील,शिरीष कुलकर्णी,हेमंत कुलकर्णी,संजय समुद्रे,वास्तुविशारद राहूल पाटील,नागेश पाटील,ॲड. महेश खणगे आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post