Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

प्रत्येक वर्षी २२ जानेवारीला लातूर ग्रामीणमध्‍ये क्रीडा महोत्सव आयोजीत करणार-आ. कराड


प्रत्येक वर्षी २२ जानेवारीला लातूर ग्रामीणमध्‍ये क्रीडा महोत्सव आयोजीत करणार-आ. कराड
नमो चषक २०२४ विविध क्रीडा स्पर्धेचा मुरुड येथे उत्साहात शुभारंभ










        लातूर दि.०२ - आयोध्येत प्रभू श्रीरामाचे मंदिर व्हावे ही लाखो, करोडो राम भक्तांची इच्छा देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी पूर्ण केली आणि संपूर्ण देशभरात २२ जानेवारी रोजी दिवाळी साजरी झाली. या निमित्ताने यापुढे दरवर्षी लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघात तरुणांना आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी २२ जानेवारीला क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले जाईल असे भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी बोलून दाखवले.

       भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने नमो चषक २०२४ च्या माध्यमातून आयोजित लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील विविध क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या शुभहस्ते १ फेब्रुवारी २०२४ गुरुवार रोजी सायंकाळी मुरुड येथे मोठ्या उत्साहाच्या वातावरणात झाला यावेळी आ. कराड बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुरुडच्या सरपंच श्रीमती अमृता अमर नाडे या होत्या तर यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विक्रमकाका शिंदे, महेंद्र गोडभरले, भाजयुमोचे प्रदेश सचिव ऋषिकेशदादा कराड, लातूर तालुकाध्यक्ष बन्सी भिसे, रेणापूर तालुकाध्यक्ष अॅड. दशरथ सरवदे, जिल्हा उपाध्यक्ष हनुमंतबापू नागटिळक, भागवत सोट, सतीश आंबेकर, ओबीसी मोर्चाचे डॉ. बाबासाहेब घुले, संगायो समिती अध्यक्ष वैभव सापसोड, भाजयुमोचे सुरज शिंदे, संजय ठाकूर, रवी माकोडे, महेश कणसे यांच्यासह भाजपाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह खेळाडू आणि क्रीडा प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

            खेळाडूंना संधी मिळावी, तरुणांना वाव मिळावा यासाठी लातूर ग्रामीण मतदार संघात मोठया प्रमाणात स्‍पर्धा होत आहेत. स्‍पर्धेत कोणीतरी जिंकत असतो कोणीतरी हरत असतो तेव्‍हा अपयशाने खचून न जाता पुन्‍हा नव्‍या उमेदीने आणि जिद्दीने खेळाडूंनी खिलाडू वृत्‍तीने खेळ खेळले पाहीजेत असे सांगून आ. रमेशअप्‍पा कराड म्‍हणाले की, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्‍या नेतृत्‍वात देश सर्वच क्षेत्रात प्रगतीचे शिखर गाठत आहे. त्‍यात क्रिडा क्षेत्रही मागे नाही. देशभरातील विविध खेळाडूंना प्रोत्‍साहन दिले आणि खेळाडूंनीही जगात देशाचे नाव उंचावून अनेक पदके मिळवीली.

            केंद्र आणि राज्‍य शासनाने गोरगरीब सामान्‍य जनतेच्‍या हिताच्‍या अनेक योजना सुरु केल्‍या, त्‍याचा लाभ असंख्‍य गरजूंना मिळत आहे. देशहिताचे आणि प्रगतीचे एैतिहासीक निर्णय घेणारे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्‍या नेतृत्‍वात तिस-यांदा केंद्रात भाजपाचे सरकार येणार असल्‍याचे सांगून या केंद्र शासनाला समर्थन देण्‍यासाठी लातूरचा खासदार विक्रमी मताने निवडूण द्यावा असे आवाहन आ. कराड यांनी यावेळी केले. मुरुड शहराच्‍या सर्वांगिन विकासासाठी राज्‍यातील महायुतीशासनाने पाणी पुरवठा योजना, उपजिल्‍हा रुग्‍णालय यासह विविध विकास कामासाठी कोटयावधी रुपयाचा निधी उपलब्‍ध करुन दिला मात्र भाजपा महायुती शासनाच्‍या योजनांचे श्रेय लाटण्‍याचा विरोधक प्रयत्‍न करत आहेत मात्र हे सर्व जनतेला ज्ञात आहे. 

          प्रारंभी युवा नेते ऋषिकेशदादा कराड यांनी स्पर्धेच्या आयोजनामागची भूमिका विशद करून लातूर ग्रामीण मधील खेळाडूंना राज्‍यस्‍तरावर खेळण्‍याची संधी मिळावी अशी अपेक्षा व्‍यक्‍त केली. भाजपाचे हनुमंतबापू नागटिळक, वैभव सापसोड, सुरज शिंदे, रवी माकोडे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत कातळे यांनी केले तर शेवटी संजय ठाकूर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

           याप्रसंगी आ. रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते विविध स्पर्धेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या (परीक्षक) पंच यांचा सत्कार करण्यात आला. खो-खो, हॉलीबॉल आणि कबड्डी मैदानाचे पूजन करण्यात आले, खेळाडूंची ओळख परेड झाली त्यानंतर प्रकाश झोतात संकल्प क्लब मुरुड आणि शरदचंद्र महाविद्यालय शिराढोण या दोन संघात कबड्डीचा सामना झाला हर्षउल्हासात झालेल्या या सामन्यात बारा गुणांनी शिराढोणच्या संघाने विजय मिळवला. मुरुड येथे होत असलेल्या क्रीडा स्पर्धेत कबड्डी ३४ संघ, खो खो २० संघ, क्रिकेट ४८ संघ, हॉलीबॉल २२ संघ सहभागी झाले आहेत.

याप्रसंगी आ. रमेशअप्‍पा कराड यांचा मुरुड ग्रामपंचायत, बांधकाम कामगार संघटना, शिवछत्रपती क्रिडा मंडळ यासह विविध क्रिडा संघटनांच्‍या वतीने सत्‍कार करण्‍यात आला. त्‍याचबरोबर भारतीय जनता युवा मोर्चाच्‍या वतीने उपस्थित प्रमुख पाहुण्‍यांचे स्‍वागत भाजयुमोचे सुरज शिंदे, संजय ठाकूर, महेश कणसे, अमर चव्‍हाण, रवि माकुडे, लहुराजे सव्‍वाशे, बालकृष्‍ण पुदाले, अक्षय भोसले, दत्‍ता पोटभरे, शुभम खोसे, समाधान कदम, सुरज देशमुख, सचिन लटपटे, विनोद कदम, किरण मुंडे, बालाजी गवळी, अमर पिंपरे, सचिन मस्‍के, प्रज्‍योत ढगे, योगेश पुदाले, राजकुमार नाडे यांच्‍यासह अनेकांनी केले.

नमो चषक २०२४ क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूसह तरुणात आणि क्रीडाप्रेमी नागरिकात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या स्पर्धा यशस्वी व्हाव्यात यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते मेहनत घेत आहेत.

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post