Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

पत्रकार दिनाचे औचित्य साधून"श्री राम मंदिर"दिवाळी विशेषांकाचे विविध मान्यवर पत्रकारांच्या हस्ते प्रकाशन


पत्रकार दिनाचे औचित्य साधून"श्री राम मंदिर"दिवाळी विशेषांकाचे  विविध मान्यवर पत्रकारांच्या हस्ते प्रकाशन




लातूर दि.6 ( जिमाका ) जिल्हा माहिती कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे विभागीय माहिती कार्यालयाच्या उपसंचालक डॉ. सुरेखा मुळे यांच्या हस्ते पुष्पहार घालून त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून पत्रकार दिन साजरा करण्यात आला. त्यानंतर
 "श्री राम मंदिर"दिवाळी विशेषांकाचे  विविध मान्यवर पत्रकारांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले 

   यावेळी जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, सहायक संचालक डॉ. शाम टरके, ज्येष्ठ पत्रकार रामराव गवळी, प्रदीप नंणदकर, नृसिंह घोणे, अशोक चिंचोले, अशोक देडे, लहू शिंदे, रघुनाथ बनसोडे, मासुम खान, अशोक हणवंते, वामन पाठक, विष्णू आष्टीकर, हारुण मोमीन, लिंबराज पन्हाळकर, यशवंत पवार, संजय बुच्चे, महादेव डोंबे, शिवाजी कांबळे, साईनाथ घोणे, शशिकांत पाटील, सितम सोनवणे, नितीन चालक, शिरीषकुमार शेरखाने, संतोष सोनवणे, महादेव पोलदासे, अशोक कुलकर्णी, मधुकर चलमले, धोडींराम ढगे, चंद्रकांत इंद्राळे, प्रभाकर शिरुरे, मुरली चेंगटे, काकासाहेब गुट्टे, अमोल घायाळ यांनीही बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. जिल्ह्यातील संपादक, जिल्हा प्रतिनिधी, इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे प्रतिनिधी, छायाचित्रकार, पत्रकार तसेच जिल्हा माहिती कार्यालय व विभागीय माहिती कार्यालयातील कर्मचारी आदिंची यावेळी उपस्थिती होती.

बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 ला मराठीतले पहिले नियतकालिक सुरु केले. तो दिवस राज्यभरात पत्रकार दिन म्हणून साजरा होतो.

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post