Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

लातूरच्या विधी पळसापुरे यांना राष्ट्रीय युवा पुरस्कार जाहीर

लातूरच्या विधी पळसापुरे यांना राष्ट्रीय युवा पुरस्कार जाहीर



लातूर / भारत सरकारच्या क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयातर्फे देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी लातुरच्या कु.विधी पळसापुरे यांना जाहीर झाला असून या सन्मानाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
सदर पुरस्कार येत्या 12 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नाशिक येथे पार पाडणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. कु. विधी ह्या माझा करिअर गाईड फाउंडेशनच्या संस्थापिका असून सामजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार जाहीर झाला आहे. गेल्या 8 वर्षापासून विधी सातत्याने विविध विकास कामे करत असून, शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या निःशुल्क करिअर मार्गदर्शनाचे कार्य त्या करत आहेत. या आधी 2 ऑक्टोबर रोजी देशाच्या संसदेतील त्यांचे भाषण सबंध महाराष्ट्रात लोकप्रिय झाले होते. लातूरचे नाव देश पातळीवर पुन्हा एकदा गाजविल्या मुळे कु. विधी व त्यांच्या आई वडिलांचे सर्वत्र कौतुक होत आहे. दिनांक 30 डिसेंबर रोजी उदगीर येथे झालेल्या महाराष्ट्र शासनाच्या राज्यस्तरीय युवा महोत्सवात क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते विधी पळसापुरे यांचा सत्कार व अभिनंदन करण्यात आले. यावेळी लातूर लोकसभा मतदासंघांचे खासदार  सुधाकर शृंगारे व इतर मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post