Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

लातूर मध्ये खाजगी शिकवणी चालकाकडून दहावीतील अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
लातूर मध्ये खाजगी शिकवणी चालकाकडून दहावीतील अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

आरोपीविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा, पोलिसांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या

लातूर: लातूर येथील एका खाजगी शिकवणी चालकाने शिकवणीसाठी आलेल्या दहावीतील अल्पवयीन मुलीला वाईट हेतुने आतील खोलीत नेत, तिचा हात पकडून, अश्लिल चाळे करीत तिच्यावर दुष्कर्म करण्याचा प्रयत्न केला असल्याची धक्कादायक घटना घडली असून ,पीडितेने त्या नराधमाच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेत पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी शिकवणी चालक आरोपी सागर मांडे याच्याविरोधात बाल लैंगिक अत्याचार अंतर्गत पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले, येथील खाजगी ट्यूशनमधील सागर मांडे याचे शिकवणी वर्ग चालतात. त्याच्याकडे अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी शिकवणीसाठी येतात, गुरूवारी (दि. १८) सायंकाळी
पाच ते सहा वाजेच्या सुमारास आरोपी शिकवणी चालक सागर मांडे हा त्याच्या शिकवणी वर्गात होता. त्याने जाणीवपूर्वक शिकवणीला आलेल्या दहावीतील अल्पवयीन विद्यार्थिनीला एकटीला थांबविले. सदर पीडितेने मला का थांबविले, असे विचारताच मांडे राने तिला पाणी आणण्यास सांगितले. मुलीने त्याला पाणी आणून देताच वाईट हेतुने मांडे याने विद्यार्थिनीचा हात धरला. तिला आतोल खोलीत घेऊन गेला. यामुळे पीडित विद्यार्थिनी
गांगारून गेली, त्याचवेळी मांडे याने आतील खोलीच्या दरवाजाची कड़ी लावून घेत विद्यार्थिनीशी वाइंट उद्देशाने तिला स्पर्श केला. तिच्यासोबत झोंबाझोंबी करू लागला, पीडित मुलीने रडण्यास सुरूवात केली, कसेबसे त्याच्या तावडीतून सुटून दरवाजाची कडी घडून शिकवणी वर्गात आली. त्यावेळी मांडेही तिच्या भागे वर्गात आला. त्याने रडत असलेल्या विद्यार्थिनीला घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर 'तुझ्यासह माझ्याकडे शिकवणीला असलेल्या तुझ्या लहान भावाला जीवे मारून टाकतो', अशी धमकी दिली,सदर पीडितेने शिकवणीवरून घरी येताच घडला प्रकार आई-वडिलांच्या कानावर घातला, पीडितेच्या फिर्यादीवरून लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपी सागर मांडे याच्याविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत 'पोक्सो'चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक मनीषा लटपटे व हेड कॉन्स्टेबल अनिल कांबळे हे करीत आहेत. या प्रकरणातील आरोपी सागर मांडे याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयासमोर हजर केले असता त्याला न्यायालयाने १४ दिवसांची न्यावालवीन कोठडी सुनावली आहे.


पीडित विद्यार्थिनींनी पोलिसांशी संपर्क साधावा

लातूर शहरात मोठ्या प्रमाणावर खाजगी शिकवणी वर्ग चालतात, त्याचप्रमाणे शाळाही मोठ्या प्रमाणावर आहेत. शिकवणी चालक व शाळेचे शिक्षक विद्यार्थ्यांचा गैरफायदा घेऊन त्यांची शारिरीक पिळवणूक करतात, ज्या विद्याथ्यर्थ्यांसमवेत, पीडितेसोबत असे प्रकार घडत आहेत, अशा पीडित विद्यार्थिनींनी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक मनीषा लटपटे यांनी केले आहे

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post