Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

रेझिंग डे निमित्त 49 लाखांचा मुद्देमाल परत


रेझिंग डे निमित्त 49 लाखांचा मुद्देमाल परत







            पोलिस रेझिंग डे निमित्त लातूर पोलिस तर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत असून विविध चोरींच्या गुन्ह्यात जप्त करण्यात आलेले सोने, वाहने व मोबाईल असा सुमारे 49 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी मूळ मालकांना परत केला.
             पोलिस दलातर्फे वर्धापन दिनामित्त आयोजित सप्ताहात पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज दिनांक 08/01/2024 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रांगणात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करून अलीकडच्या काळातील चोरीच्या गुन्ह्याचा तपास करून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. लातूर पोलिसांनी विविध गुन्ह्यांची उकल करून गुन्हे उघडकिस आणून गुन्ह्यात चोरीस गेलेला सुमारे 49 लाख 9 हजार 756 रुपयाचा मुद्देमाल मूळ फिर्यादींना परत देण्यात आला.
             
हे मुद्देमाल वाटप.

-सोन्याचांदीचे 19 दागिने एकूण 19 लाख 33 हजार 746 किंमतीचे.

-दुचाकी व चारचाकी 29 वाहने एकूण किंमत 18 लाख 60 हजार


-45 मोबाईल फोन एकूण रक्कम 4 लाख 52 हजार किमतीचे

-2 लाख 8 हजार रुपये रोख रक्कम इतर मुद्देमाल असा एकूण रक्कम 49 लाख 9 हजार 756 किंमतीचा मुद्देमालाचे वाटप करण्यात आला.
          तसेच ज्या फिर्यादींना मुद्देमाल परत मिळाला आहे त्यांनी आपले मनोगत व्यक्त करून पोलीस दलांचे आभार व्यक्त केले.
          यावेळी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर भागवत फुंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी (लातूर ग्रामीण) सुनील गोसावी, परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल, पोलीस उपअधीक्षक (गृह) करन सोनकवडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, यांच्यासह विविध पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, तपासी अधिकारी, अमलदार, मूळ फिर्यादी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post