Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

फुलंब्रीच्या सरपंचाने मराठा आंदोलकांवर लाठीमाराच्या घटनेचा स्वतःचीच गाडी पेटवून केला निषेध

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
  फुलंब्रीच्या सरपंचाने मराठा आंदोलकांवर लाठीमाराच्या घटनेचा स्वतःचीच गाडी पेटवून केला निषेध





छत्रपती संभाजीनगर : जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या घटनेचे पडसदार राज्यभरात उमटताना दिसत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा येथील सरपंचाने स्वतःचीच गाडी पेटवून दिली. गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी स्वत:ची चारचाकी कार जाळून लाठीमाराच्या घटनेचा निषेध केला. फुलंब्रीतील पाल फाटा येथे भर रस्त्यात हा प्रकार घडला.

मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली येथे सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलना दरम्यान लाठीमाराची घटना घडली होती. गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी फुलंब्रीतील पाल फाटा येथे भर रस्त्यात स्वत:ची चारचाकी कार जाळून लाठीमाराच्या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post