Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

दिव्यांगासाठी घरपट्टी, नळपट्टी ५०% माफ करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार-प्रमोद गुडे

दिव्यांगासाठी घरपट्टी, नळपट्टी ५०% माफ करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार-प्रमोद गुडे

भाजपाचे नवनिर्वाचित डॉ बाबासाहेब आंबेडकर मंडल अध्यक्ष प्रमोदजी गुडे


लातूर/ प्रतिनिधि 
अपंग हक्क स्वाभिमान प्रतिष्ठान तर्फे त्यांच्या कार्यालयात शनिवार दि.9सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता भाजपाचे नवनिर्वाचित डॉ बाबासाहेब आंबेडकर मंडल अध्यक्ष प्रमोदजी गुडे, चिटणीस मुन्ना भाई हाश्मी व ओबीसी मोर्चा अध्यक्ष अजयजी भुमकर यांचा सत्कार करण्यात आला 

दिव्यांग व्यक्तींचे दु:ख दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक योजनांची घोषणा केली. त्यांना अपंग न म्हणता दिव्यांग म्हणा असेही सुचविले. दिव्यांगांना समाजाचा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जशी जबाबदारी घेतली तशी प्रत्येकाने घ्यावी. तरच दिव्यांग विविध क्षेत्रात उंच भरारी घेऊ शकतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समानतेचा संदेश दिला आहे. 

पूर्वजन्मात केलेले पाप दुसऱ्या जन्मात दिव्यांगाचा रूपाने येते, अशी मानसिकता आजही कायम आहे. यातून बाहेर पडल्यावरच आपण दिव्यांग मुलांवर उपचार, शिक्षण व त्यांना त्यांच्या पायावर उभे करू शकू, जन्मत: दोष असणाऱ्या किंवा अपघाताने दिव्यांगता आलेल्या मुलांचे पुनर्वसन करणे हे देवाचे कार्य असल्यासारखेच आहे. सामाजिक कार्य करणे हे प्रत्येक नागरिकाचे उत्तरदायित्व आहे. प्रत्येक नागरिकाने आपले सामाजिक दायित्व पूर्ण करणे आवश्यक आहे. यातूनच देशाच्या विकासात मोठी झेप घेता येईल तसेच दिव्यांगासाठी घरपट्टी, नळपट्टी ५०% माफ करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचेही अभिवचन भाजपाचे नवनिर्वाचित डॉ बाबासाहेब आंबेडकर मंडल अध्यक्ष प्रमोदजी गुडे यांनी याप्रसंगी दिले आहे 

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post