Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

श्री गणेश विसर्जनासाठी महापालिका सज्ज !शहरात १५ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र

श्री गणेश विसर्जनासाठी महापालिका सज्ज !शहरात १५ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र

प्रदूषण टाळण्यासाठी मूर्ती, संकलन केंद्रातच देण्याचे आवाहन


     लातूर/प्रतिनिधी:प्रदूषण टाळण्यासाठी शहरातील नागरिकांनी आपापल्या घरी स्थापित केलेल्या गणेश मूर्तींचे विसर्जन जलाशयात न करता मनपाने उभारलेल्या संकलन केंद्रांकडे त्या मुर्ती द्याव्यात. सार्वजनिक गणेश मंडळांनी १२ नंबर पाटी येथील खदानीत विसर्जन करावे,असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.

      दहा दिवसांपूर्वी स्थापित केलेल्या श्रीगणेशाचे गुरूवारी (दि.२८ सप्टेंबर )विसर्जन होणार आहे.शहरातील नागरिक आपल्या लाडक्या बप्पाला निरोप देणार आहेत.प्रथेप्रमाणे श्रीगणेशाच्या मुर्तीचे जलाशयात विसर्जन केले जाते. गेल्या कांही वर्षांपासून प्रदूषण टाळण्यासाठी मनपा गणेश मूर्ती संकलन केंद्र कार्यान्वित करते. यामुळे गणेश मूर्ती पाण्यात विसर्जित केल्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाला कांही अंशी प्रतिबंध करता येऊ शकतो. नागरिकांनी आपल्या मुर्ती संकलन केंद्रात देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  सार्वजनिक गणेश मंडळांच्या मोठ्या मूर्तींसाठी १२ नंबर पाटी जवळील खदानीत या मूर्तींचे विसर्जन करता येणार आहे. यासाठी संबंधित मंडळांनी स्वतःच्या वाहनाने मूर्ती तेथपर्यंत आणाव्यात, तसेच श्री गणेश मुर्तीचे विसर्जन मिरवणुक श्री सिध्देश्वर मंदीर परीसर, कव्वा रोड, बांधकाम भवन या ठिकाणी मिरवणुकी नंतर श्री गणेश मुर्तीचे संकलन करण्यात येणार आहे.

    गतवर्षीप्रमाणेच घरगुती गणेश मंडळांसाठी मनपाकडून शहरात १५ ठिकाणी संकलन केंद्र उभारण्यात आली आहेत.या ठिकाणी मनपाचे कर्मचारी दिवसभर उपस्थित राहून मुर्तींचे संकलन करणार आहेत. नांदेड रस्त्यावर यशवंत शाळा,विवेकानंद चौकातील पाण्याची टाकी,मंठाळे नगरमध्ये मनपा शाळा क्रमांक ९, सिध्देश्वर मंदिर, जिल्हाधिकारी कार्यालया जवळील शासकीय विहीर, बार्शी रस्त्यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची पाण्याची टाकी,दयानंद महाविद्यालयाचा पार्किंग परिसर,सरस्वती कॉलनीतील पाण्याची टाकी,टाऊन हॉल, बांधकाम भवन,कव्हा रस्त्यावर खंदाडे नगर, साळे गल्लीतील यशवंत शाळा,तिवारी यांची विहीर,गणेश मंदिर व काशी विश्वेश्वर मंदिर ग्रीन बेल्ट या ठिकाणी यावर्षी मूर्ती संकलन केंद्र उभारली जाणार आहेत.

  श्री गणेश विसर्जना वेळी आपल्याकडील गणेश मूर्ती मनपाने उभारलेल्या संकलन केंद्रात द्याव्यात. पालिकेकडून या सर्व मूर्तींचे १२ नंबर पाटीवरील खदानीत विधीवत विसर्जन केले जाणार आहे.नागरिक व गणेश भक्तांनी या उपक्रमात मनपाला सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.


Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post