Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

चांद्रयान ३ या मिशनमध्ये सिंहाचा वाटा उचलणाऱ्या इस्त्रोच्या शास्त्रज्ञा एन वलारमथी यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

चांद्रयान ३ या मिशनमध्ये सिंहाचा वाटा उचलणाऱ्या इस्त्रोच्या शास्त्रज्ञा एन वलारमथी यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏


भारताच्या चांद्रयान ३ या मिशनमध्ये सिंहाचा वाटा उचलणाऱ्या इस्त्रोच्या शास्त्रज्ञा एन वलारमथी यांचं आज ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. चेन्नईतील एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. चांद्रयान ३ च्या उड्डाणापूर्वी एन वलारमथी यांनीच त्याचं उलटं टायमर लावलं होतं. तसेच चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड होताच त्यांनी सहकाऱ्यांसह देशाला आनंदाची बातमी दिली होती. त्यामुळं आता इस्त्रोच्या शास्त्रज्ञा एन वलारमथी यांच्या निधनामुळं भारतासह जगभरात शोक व्यक्त केला जात आहे. काही दिवसांपूर्वी चांद्रयान ३ चंद्रावर उतरवून आनंद साजरा करणाऱ्या इस्त्रोच्या शास्त्रज्ञांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post